वझ्झरमधून वसंतीची पाठवणी!
By Admin | Updated: April 26, 2015 00:17 IST2015-04-26T00:17:44+5:302015-04-26T00:17:44+5:30
वझ्झर येथील बालगृहातून शंकरबाबा पापळकरांची मानसकन्या ‘वसंती’ची रीतसर पाठवणी करण्यात आली.

वझ्झरमधून वसंतीची पाठवणी!
रविवारी लग्नसोहळा : महापौर करणार कन्यादान
अमरावती : वझ्झर येथील बालगृहातून शंकरबाबा पापळकरांची मानसकन्या ‘वसंती’ची रीतसर पाठवणी करण्यात आली. रविवारी बडनेरा मार्गावरील मंगल कार्यालयात तिचा विवाह सोहळा आयोजित असून महापौर चरणजितकौर नंदा तिचे कन्यादान करणार आहेत. त्यामुळे शंकरबाबांनी त्यांची ही मानसकन्या महापौरांच्या स्वाधीन केली. यावेळी वझ्झर आश्रमातील सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.
वसंती आणि धामणगाव गढी येथील वसंत अग्रवाल यांचा विवाह थाटात साजरा होईल. अध्यक्षस्थानी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, उपायुक्त रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदी उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)