वरूड हादरले! निर्घृण खून करून तरुणाला पेटवले; बेसखेडा शिवारात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळबळ

By प्रदीप भाकरे | Updated: March 29, 2026 20:15 IST2026-03-29T20:14:43+5:302026-03-29T20:15:09+5:30

वरूड तालुक्यातील बेसखेडा शिवार रविवारी सकाळी रक्ताने माखल्याचे समोर आले आहे.

Varud shocked! A young man was brutally murdered and set on fire; A partially burnt body was found in Beskheda Shivara, causing a stir | वरूड हादरले! निर्घृण खून करून तरुणाला पेटवले; बेसखेडा शिवारात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळबळ

वरूड हादरले! निर्घृण खून करून तरुणाला पेटवले; बेसखेडा शिवारात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळबळ

अमरावती : ​वरूड तालुक्यातील बेसखेडा शिवार रविवारी सकाळी रक्ताने माखल्याचे समोर आले आहे. एका अंदाजे ३० वर्षीय अज्ञात तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी, वरूड पोलिसांनी रविवारी सायंकाळी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
                   
खैरगाव (ता. नरखेड) येथील रहिवासी सुनील शंकरराव ढोमणे यांना त्यांचा पुतण्या शुभमने रविवारी सकाळी बेसखेडा शिवारातील शेताच्या नाल्याजवळ एक मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. सुनील ढोमणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना एका अज्ञात तरुणाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत दिसून आले. हा मृतदेह इतक्या भीषण अवस्थेत होता की, पोटातील आतड्या बाहेर आल्या होत्या आणि शरीरावरील कपडे व डोक्याचे केस पूर्णपणे जळाले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या तरुणाचा खून करून ओळख पटू नये आणि पुरावा सापडू नये, यासाठी त्याला शेताच्या नाल्यात जाळले. याप्रकरणी वरूड पोलिसांनी सुनील ढोमणे यांच्या फिर्यादीवरून खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आहे.

​पोलिसांची पाच पथके रवाना

या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. स्थानिक गुन्हे शाखेची तीन आणि वरूड पोलीस स्टेशनची दोन अशी एकूण ५ विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. अंदाजे ३० वर्षे वयाच्या त्या गृहस्थाच्या पायात प्लास्टिकचे बूट, उजव्या हाताच्या बोटात स्टीलची अंगठी, तर गळ्यात लाकडी किंवा तुळशीच्या मण्यांची माळ आढळली. तेथे स्टीलची तंबाखू-चुन्याची डबी देखील आढळून आली. आपल्या भागातून या वर्णनाचा कोणताही तरुण बेपत्ता किंवा मिसिंग असेल, तर तातडीने  संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय किरण वानखडे यांनी केले आहे.

Web Title : वरुड में क्रूर हत्या: युवक को जलाया, शव बरामद

Web Summary : वरुड के बेसखेड़ा में एक 30 वर्षीय व्यक्ति की क्रूर हत्या कर जला दिया गया। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर जांच के लिए पांच टीमें गठित की हैं। पीड़ित के पास विशिष्ट आभूषण थे, और पुलिस विवरण से मेल खाने वाले लापता व्यक्तियों के बारे में जानकारी मांग रही है।

Web Title : Brutal Murder in Warud: Young Man Burned, Body Found

Web Summary : A 30-year-old man was brutally murdered and burned in Beskheda, Warud. Police have registered a murder case and formed five teams to investigate. The victim had distinctive jewelry, and police are seeking information about missing persons matching the description.