बडने-यात वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन, विजयकुमार गवई अध्यक्ष, भाऊ लोखंडे उद्घाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 17:14 IST2017-11-13T17:14:17+5:302017-11-13T17:14:37+5:30
बडनेरा : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे सार्वजनिक कपिल बुद्धविहार सोशल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन बडनेरा येथे १८, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले

बडने-यात वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन, विजयकुमार गवई अध्यक्ष, भाऊ लोखंडे उद्घाटक
बडनेरा : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे सार्वजनिक कपिल बुद्धविहार सोशल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन बडनेरा येथे १८, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या गीत, नाटक विभागाचे पश्चिम भारत विभागाचे निवृत्त क्षेत्रीय संचालक आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विजयकुमार गवई असून, आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
स्थानिक कपिल मंडळाच्या सभागृहात होणा-या या संमेलन परिसराला आंबेडकरी कवी रोहण नागदिवे यांचे नाव दिले असून लोककवी मदन नंदेश्वरांचे नाव सभागृहाला व मंचाला लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि कलावंत डॉ. रुस्तुम अचलखांब यांचे नाव देण्यात आले आहे.
दोन दिवसीय संमेलनाचा आरंभ १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संविधान रॅलीने होणार आहे. ही रॅली बसस्टँडजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघणार आहे. ती बस स्टँड, स्टेशन रोड आणि आठवडी बाजारमार्गे अशोकनगरमधून संमेलनस्थळी दाखल होईल. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे आणि स्वागताध्यक्ष विलास साखरे रॅलीचे स्वागत करतील.