शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांची शक्कल खासगी व्यक्तींचा वापर

By admin | Updated: December 26, 2015 00:01 IST

सरकारी काम आणि त्यासाठी घेतली जाणारी लाच, हे परस्परपुरक समिकरण काही दशकांपासून समाजात रुढ झाले आहे.

कमिशनबाजी : वर्षभरात २१ दलाल गजाआडअमरावती : सरकारी काम आणि त्यासाठी घेतली जाणारी लाच, हे परस्परपुरक समिकरण काही दशकांपासून समाजात रुढ झाले आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी लाचलुचपत खात्याचा जन्म झाला. सापळे यशस्वी होऊ लागले. अनेकजण गजाआड गेले. मात्र, आता या लाचखोरांनी त्यावरही ‘खासगी व्यक्तीं’चा जालिम उपाय शोधून काढला आहे. लाच तर घ्यायचीच. मात्र, अगदी आवश्यकच असेल तरच समोर यायचे; एरवी एखाद्या खासगी व्यक्तीला भरीस पाडून, पैशांचे प्रलोभन दाखवून त्याच्या माध्यमातून लाच स्वीकारण्याचे प्रमाण वाढले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात यंदाच्या वर्षात अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबतच २१ खासगी दलाल आणि व्यक्ती अडकल्या. सन २०१४ मध्ये लाच स्वीकारणाऱ्या १८ जणांना ‘खासगी व्यक्ती’ म्हणून एसीबीने जेरबंद केले होते. लाच स्वीकारताना बदनामी टाळण्याचे धोरण असल्याने अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी मर्जीतील माणसे पोसल्याचे अनेक कार्यालयात उघडपणे दिसून येते. अमरावती विभागात जानेवारी २०१५ ते डिसेंबर अखेरपर्यंत १३० गुन्ह्यात १८४ लाचखोरांना अटक केली. त्यातील खासगी व्यक्तिंचा आकडा २१ आहे. हा आकडा बराच बोलका आहे. पोलीस, महसूल आणि इतर विभागातील लाचखोर अधिकारी, कर्मचारी कारवाईपासून वाचण्यासाठी खासगी व्यक्तिंचा वापर करतात. ‘सेफ्टी’ साठी वापरअमरावती : लोकसेवकांवर कठोर कारवाई होत असल्याने एखाद्या खासगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच घेण्याचा - मागण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. ‘सेफ्टी’ म्हणून हा फंडा वापराला जातो. पुढे पोलीस तपासात संबंधित लोकसेवकाला खासगी व्यक्तीच्या सहभागचा बेनिफिटही मिळतो. व्हाईस रेकॉर्डमधून वाचता येते. तथापि तपासात कुठेही व्यत्यय वा क्लिष्ठता येत नाही. आम्ही संबंधित लोकसेवकापर्यंत पोहोचतोच. लोकसेवक किंवा खासगी व्यक्तीही लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लगेचच तक्रार करा, असे आवाहन एसीबीचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे यांनी केले आहे. कोणतेही काम करुन घेण्यासाठी लाच देवू नका, प्रलोभनाला बळी पडू नका, असेही चिमटे यांनी म्हटले आहे. लाचखोरीच्या पद्धतीप्रत्येक वेळी लाच थेट घेतली जाते, असे नाही. पोलीस खात्यात तर बहुतांश कनिष्ठ कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनविण्यात येते. अनेक प्रकारात एक जागा निश्चित करून त्या ठिकाणी रक्कम ठेवण्यास सांगितले जाते. लाचखोरीच्या एका प्रकरणात अडकलेल्या अमरावती जिल्हा परिषदेच्या ‘कॅफो ने तर लाच आणि ‘वरची’ रक्कम स्वीकारण्यासाठी आपल्या कक्षात खास अशी थर्माकोलची पेटी बनविली होती. ही बाब त्यावेळी अनेकांनी पाहिली होती. त्याशिवाय फोनवरुन संपर्क साधून लाचेची रक्कम एखाद्या विशिष्ट खात्यात जमा करण्यासही सांगितले जाते. अशा एक ना अनेक तऱ्हा वापरून लाचखोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होण्याऐवजी वाढच होऊ लागली आहे. जानेवारी ते डिसेंबर-२०१५ दरम्यान अमरावती विभाग लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १३० दाखल गुन्ह्यांमध्ये १८४ जणांना अटक केली. त्यातही महसूल आणि पोलीस अव्वल राहिले. महसूल विरुद्ध ३० तर पोलीस विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांविरोधात २९ तक्रारी नोंदविण्यात आल्यात. एकूण ४४ व्यक्ती सापळ्यांमध्ये अडकल्या आहेत. लाचखोरी प्रकरणात आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून लोकसेवकांकडून खासगी व्यक्तींचा वापर अधिक प्रमाणात वाढला आहे. याअंतर्गत खासगी इसमांवरही कारवाई करण्याची तरतूद आहे. - महेश चिमटे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती.