शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर बाजार रुग्णालयाचे ‘अपग्रेडेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:01 IST

१ कोटी ५१ लाख रुपये निधीतून चांदूर बाजार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आ. बच्चू कडू यांचा संकल्पनेतून या आगारात एसटी बस चालक व वाहकांना थांबण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच सुंदर बगीचा उभारण्यात येत आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू यांचा पाठपुरावा : दीड कोटींच्या निधीतून आगाराचेही सुशोभीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : स्थानिक ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावतीकरण करण्याबाबत आ. बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या भगिरथ प्रयत्नांतून या रुग्णालयासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या ६० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम जोमात सुरू आहे. सोबतच दीड कोटी रुपयांच्या निधीतून चांदूर बाजार आगाराचे सुशोभीकरण केले जात आहे.तालुका मुख्यालय असलेल्या चांदूर बाजार शहराच्या वाढती लोकसंख्येमुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना हव्या तशा सुविधा उपलब्ध होत नाहीत. इमारतीची जागाच मोजकी असल्याने अनेक रुग्णांना खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागते. यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर व्हावे, याकरिता आमदार बच्चू कडू यांनी पाठपुरावा केला आणि ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत उपजिल्हा रुग्णालय निर्मितीसाठी ११ कोटी १७ लाख रुपयांचा निधी खेचून आणला. आता या निधीतून रुग्णालयाची भव्य इमारत उभारली जात आहे. येथे रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.शहरातील स्वीपर कॉलनी येथील मंदिराच्या सुशोभीकरणाकरिता आ. बच्चू कडू यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी त्यांच्यासह नगरसेवक नितीन कोरडे, सरदार खान, सचिन खुळे, माजी उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, शहर अध्यक्ष आबू वानखडे तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.एसटी आगाराचे नूतनीकरण१ कोटी ५१ लाख रुपये निधीतून चांदूर बाजार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आ. बच्चू कडू यांचा संकल्पनेतून या आगारात एसटी बस चालक व वाहकांना थांबण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच सुंदर बगीचा उभारण्यात येत आहे. याशिवाय चांदूर बाजार ते अमरावती मार्गातील जयस्तंभ ते तहसील कार्यालय या मुख्य रस्त्याकरिता आ. कडू यांनी दीड कोटींचा निधी उपलब्ध केला आहेत. जयस्तंभ चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याचे चौपदरीकरण, सौंदर्यीकरण व सुधारणेवर हा निधी खर्च होणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या रस्त्याच्या कामानंतर शहरातील वाहतूक सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू