शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा बांबू प्रकल्प बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:32 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून बांबू हस्तकला व कला केंद्र (भाऊ) सुरू करण्यात आले. मात्र, हा प्रकल्प केवळ उद्घाटनापुरताच ठरला असून, हल्ली हा प्रकल्प केंद्र बेवारस स्थितीत पडलेला आहे. यातील मशिनरी व अन्य साहित्य धूळखात आहे.

ठळक मुद्देनिधी, जागेचा अपव्यय : मशिनरी धूळखात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून बांबू हस्तकला व कला केंद्र (भाऊ) सुरू करण्यात आले. मात्र, हा प्रकल्प केवळ उद्घाटनापुरताच ठरला असून, हल्ली हा प्रकल्प केंद्र बेवारस स्थितीत पडलेला आहे. यातील मशिनरी व अन्य साहित्य धूळखात आहे.पुणे येथून ५ आॅक्टोबर २०१८ रोजी बांबू हस्तकला व कला केंद्राचा शुभारंभ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आॅनलाईन करण्यात आला. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एकाचवेळी बांबू प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर उपस्थित होते. मात्र, साडेतीन महिन्यांनंतर बांबू केंद्राकडे कोणीही जाऊन पाहिले नाही. ही वास्तू तशीच उभी असून, ‘भाऊ’ला काहीतरी होईल, याची प्रतीक्षा आहे. या प्रकल्पातून बांबू प्रशिक्षण, साहित्य, वस्तू तयार करून बाजारपेठ निर्मितीचे उद्दिष्ट होते. मात्र, बांबू ट्रीटमेंट प्लॉटअभावी हा प्रकल्प जैसे थे आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अवानिधी लागला. मशिनरी तशाच पडून आहेत. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडून पुढे कोणत्याही गाईडलाईन मिळालेल्या नाहीत. बांबू बोर्डाच्या माध्यमातून या केंद्राला तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. तसेच या केंद्रात किमान २० विद्यार्थ्यांना बांबूपासून साहित्य, वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देखील तज्ञ्जांकडून देण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, बांबू प्रकल्पाचे काम पुढे का सरकत नाही, हासुद्धा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू करून विद्यापीठाने काय साध्य केले, असा सवाल उपस्थित होत आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना व कौशल्य अवगत व्यक्तींना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील हा प्रकल्प सुरू होण्याची उत्सुकता लागलेली असल्याचे दिसून येत आहे.बांबू प्रकल्पात कोर्स वर्कअमरावती विद्यापीठाच्या बांबू हस्तकला व कला केंद्रात कोर्स वर्क सुरू केले जाणार आहे. त्याकरिता एमएससीए पोर्टलवर नोंदणी अनिवार्य असणार आहे. पहिली बॅच १० विद्यार्थ्यांची असून, मेरीटनुसार प्रवेशाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर दुसरी बॅच प्रवेशित होईल. ५५ व ६० दिवसांचे बांबू प्रकल्पात कोर्स वर्क शिकविले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे बांबू केंद्रप्रमुख प्रशांत गावंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.