रेल्वे स्थानकांवर अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:30 PM2018-05-04T23:30:53+5:302018-05-04T23:31:05+5:30

रेल्वेत चढ्या दराने खाद्यपदार्थ प्रवाशांच्या माथी मारण्याची बाब नित्याचीच आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकावर अनधिकृत खाद्यपदार्थ विके्रत्यांची गँगच तयार झाली असून, याकडे रेल्वे सुरक्षा दलाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

Unauthorized food dealers' gang on railway stations | रेल्वे स्थानकांवर अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गँग

रेल्वे स्थानकांवर अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गँग

Next
ठळक मुद्देप्रवाशांचे आरोग्य धोक्यात : अप्रमाणित पदार्थांची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : रेल्वेत चढ्या दराने खाद्यपदार्थ प्रवाशांच्या माथी मारण्याची बाब नित्याचीच आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकावर अनधिकृत खाद्यपदार्थ विके्रत्यांची गँगच तयार झाली असून, याकडे रेल्वे सुरक्षा दलाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. बिनधास्तपणे अप्रमाणित खाद्यपदार्थ विकले जात असताना रेल्वेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चूप्पी का, हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ, शीतपेय, साहित्य विक्र ीसाठी रेल्वे प्रशासनाने पाच परवानाधारक नेमले आहेत. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विक्रीसाठी घाणीच्या ठिकाणी तयार करून आणले जातात.
रेल्वे नियमानुसार खाद्यपदार्थ हे विक्रीपूर्वी वैद्यकीय अधिकाºयांकडून प्रमाणित करणे अनिवार्य आहे. मात्र, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीचा सपाटा सुरू असल्याने या पदार्थाची वैद्यकीय तपासणीचा प्रश्नच येत नाही. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या हद्दीत खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी असलेले कक्ष (भट्टीघर) केव्हाचेच बंद झाले आहे. असे असताना रेल्वे गाड्या किंवा प्लॅटफार्मवर अनधिकृत खाद्यपदार्थ कोणाच्या आशीर्वादाने विकले जातात, हादेखील संशोधनाचा विषय आहे.
परवानाधारक खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे नियमानुसार वेेंडरची संख्या नेमून दिली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या नियमांचे धिंडवडे उडत असताना, रेल्वे सुरक्षा दल अथवा पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही, हे वास्तव आहे. रेल्वेत गाड्यात खाद्यपदार्थ विक्र ी करणाºया वेंडर्ससाठी ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. तथापि, बाहेरील खाद्यपदार्थ विक्रेते प्लॅटफार्मवर येऊन गाड्यात प्रवाशांना अव्वाच्या सव्वा दराने पदार्थ विक्री करण्यापर्यंत मजल गाठत आहेत. रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर अनधिकृत खाद्यपदार्थ, साहित्य विक्री होत असताना बडनेरा रेल्वे सुरक्षा दलाला ही बाब दिसू नये, हे आश्चर्य मानले जात आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने ‘कँटीनचालकांकडून नियमांची एैशीतैसी’ या आशयाखाली बातमी प्रकाशित करुन खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा कारभार चव्हाट्यावर आणला होता. रेल्वे प्रशासनाने कारवाई केली नाही. बडनेरा स्टेशन प्रबंधक आर. डब्ल्यू. निशाणे यांनी याबाबत आरपीएफला नोटीस बजावल्याची माहिती आहे.

‘मॉडेल’वरील अनधिकृत विक्रेता कोण?
अमरावती येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर राजरोसपणे अनधिकृत खाद्यपदार्थ विकले जातात. हा खाद्यपदार्थ विक्रेता रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाला हाताशी धरून अनधिकृतरीत्या खाद्यपदार्थ विकतो. विशेषत: अमरावती-मुंबई एक्स्प्रेस या गाडीच्या वेळी खाद्यपदार्थ, शीतपेयाची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मॉडेल रेल्वे स्थानकावर अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेता कोण, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

रेल्वेत ‘भाईगिरी’ बळावली
बडनेरा रेल्वे स्थानकाच्या हद्दीलगत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अड्डे थाटले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाºयांना हाताशी धरून हा सर्व प्रकार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. अनधिकृत खाद्यपदार्थ तयार करून ते विकण्याच्या प्रक्रियेत बहुतांश ‘भाईगिरी’चा वापर होतो. दर्जाहीन खाद्यपदार्थ विकणारी गँग तयार झाली असून, याला कोण आवर घालणार, असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.

Web Title: Unauthorized food dealers' gang on railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.