शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रकल्पग्रस्तांनी जिंकली न्यायाची लढाई

By admin | Updated: November 15, 2014 01:12 IST

नांदगाव पेठस्थित औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) ...

अमरावती : नांदगाव पेठस्थित औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. सलग चार दिवस चाललेल्या उपोषणात सात जणांची प्रकृतीही खालावली. अखेर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्रकल्पग्रस्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर विस्तृत चर्चा झाली. अखेर सर्व मागण्या तातडीने मंजूर केल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यावेळी अल्पसा मोबदला देऊन या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली. मात्र त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेतजमीन प्रकल्पात गेल्यानंतर त्यांना उपजिविकेचे इतर कोणतेही साधन नसून दिलेल्या तोकड्या रक्कमेत सध्याच्या महागाईच्या काळात जमीन घेणे अशक्य होत आहे. त्यामुळे जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी कलम २८ (अ) अंतर्गत २९६ प्रकल्पग्रस्तांनी प्रकरणे दाखल केली होती. मात्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाने २५० प्रकरणांचाच समावेश यादीत केला आहे.मात्र उर्वरित प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून त्यांना न्याय न दिल्याने अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. सलग चार दिवस चाललेल्या उपोषणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेतजमीणीचा सध्याच्या बाजारभावानुसार वाढीव मोबदला देण्यात येणार आहे. सोफिया पॉवर कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगारसुध्दा उपलब्ध जागेनुसार दिला जाईल. मोबदला देताना जे शेतकरी वंचित होते त्यांनाही समावून घेऊन येत्या मंगळवारपर्यंत मोबदला वाटपाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी संबधीतांना दिले आहे. बैठकीला सोफीयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिंमतराव देशभ्रतार, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, भूसंपादन अधिकारी यांच्यासह आंदोलनकर्ते प्रवीण मनोहर,पांडुरंग धनसुईकर, वासुदेव लव्हाळे, सुखदेव मेश्राम आणि सत्यभामा मेश्राम, म. शकील म. नजीर, शे. इसमाईल शे. इसराईल, शे. दिवान शे. बुट्टू, रामकृष्ण पारवे, सुखदेवराव मेश्राम, पांडुरंग धनसुईकर, वासुदेव लव्हाळे, नारायण टाके, अ.बशीर शे. बट्टू, राजू पांडे, मारोतराव धंदेर, गणेश पांडे आदी उपस्थित होते.