शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका

By गणेश वासनिक | Updated: October 7, 2024 19:40 IST

Srikant Shinde Criticize Uddhav Thackeray: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण अजूनही काही लोकांची भाषा सुधारली नाही. एक म्हण आहे. ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’. आपल्या बाब्याने दोन-दोन आमदारांचा बळी घेतला आहे. मी जनतेतून निवडणूक आलो आहे. फाईट करून निवडणूक आलो आहे,असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

- गणेश वासनिक अमरावती -  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण अजूनही काही लोकांची भाषा सुधारली नाही. एक म्हण आहे. ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’. आपल्या बाब्याने दोन-दोन आमदारांचा बळी घेतला आहे. मी जनतेतून निवडणूक आलो आहे. फाईट करून निवडणूक आलो आहे. लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मला चॅलेंज केले होते; पण ते पळून गेले. निवडणूक लढले नाही, अशी बोचरी टीका शिंदेसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोमवारी केली.

खासदार डॉ. शिंदे हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता दर्यापूर येथे आयोजित मेळाव्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘लक्ष्य’ केले. कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांना जनतेने जागा दाखवून दिली. काँग्रेसच्या मतांवर यांच्या जागा या निवडून आल्या. येणाऱ्या काळात उद्धवसेनेची परिस्थिती ना काँग्रेस, ना घर का ना घाट का, अशी करून ठेवेल, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, निवडणुकीत विजयाचा स्ट्राईक रेट हा शिंदेसेनेकडे आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी सतत काँग्रेसला विरोध केला आहे. आता उद्धवसेना हा काँग्रेसच्या दावणीला बांधला गेला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धवसेना कुठेच दिसणार नाही, असा दावा त्यांनी केला. महायुती सरकारने अडीच वर्षांत घेतलेले लोककल्याणकारी निर्णय हेच विधानसभा निवडणुकीत यशाचे गमक ठरेल, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.यावेळी माजी आमदार अभिजित अडसूळ, गजू वाकोडे, गोपाल अरबट आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAmravatiअमरावतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४