दुचाकींच्या धडकेत दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:46 IST2019-05-10T00:46:13+5:302019-05-10T00:46:31+5:30
लगतच्या कुसुमकोट ते शिरपूर मार्गावर दोन दुचाकी परस्परांना भिडल्याने झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.

दुचाकींच्या धडकेत दोन गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : लगतच्या कुसुमकोट ते शिरपूर मार्गावर दोन दुचाकी परस्परांना भिडल्याने झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.
लालसिंग नवलसिंग शेलकर (३०,रा.शिरपूर) हे एमएच २७ बीजे ८५०७ या दुचाकीने गावाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या श्रावण मोतीराम मावस्कर (२५, रा.आकी) या दुचाकीस्वारांमध्ये समोरासमोर धडक झाली. दोघांनाही तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी परस्परांविरूद्ध गुन्हा दाखल केला.