तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 15:08 IST2023-07-20T15:06:56+5:302023-07-20T15:08:48+5:30

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Two people died, two seriously due to toxic alcohol in Taroda | तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर

तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर

अजय पाटील 

मोर्शी (अमरावती) : स्थानिक मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा धानोरा येथे विषारी दारू सेवन केल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर आहेत. मयाराम कुंजीलाल धुर्वे, जगलु फत्तेसिंग टेकाम अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मयाराम धुर्वे व जगलु टेकाम दोघे आपल्या राहत्या घरी मृत्युमुखी पडले तर सिताराम शेषराव परतेती व एक महिला  दारू पिल्याने अत्यावस्थ झाल्यामुळे त्यांना तातडीने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. दारू सेवनानेच की इतर सेवनाने त्यांना विषबाधा झाली हे आज सांगता येणार नाही असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी सांगितले. त्यांना कशातून विषबाधा झाली हे रिपोर्टनुसार ठरविण्यात येईल. परतेती व एक महिला यांची प्रकृती  गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत.

Web Title: Two people died, two seriously due to toxic alcohol in Taroda