ट्रकच्या विचित्र अपघातात दोन ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:59+5:30
बुलढाणा येथून मिरची घेऊन निघालेल्या डब्ल्यूबी २३ सी-८७०० क्रमांकांचा ट्रक नागपूरकडे भरधाव जात असतांना ट्रकचे नियंत्रण सुटले. अनुराधा पेट्रोल पंपजवळ उभ्या असलेल्या दोन मालवाहू वाहनांना त्याने जबर धडक दिली. अनियंत्रित ट्रक पेट्रोल पंप परिसरात शिरला. यामध्ये पेट्रोलपंपावरील कर्मचारी मंगेश पकडे जखमी झाला. तर अनियंत्रित ट्रकमधील चालक व क्लिनर जागीच ठार झाले.

ट्रकच्या विचित्र अपघातात दोन ठार, एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगांव पेठ : महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास येथील अनुराधा पेट्रोल पंपावर घडली. अनियंत्रित ट्रकने आधी दोन उभ्या मालवाहू वाहनांना धडक दिली. नंतर तो ट्रक चक्क पेट्रोल पंप आवारात शिरल्याने पेट्रोल पंप कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला आहे. चालक लालबाबू मो. आयुब (४५) व वाहक मालहैफूज आलम मोहम्मद बद्रुल (२५, दोघेही रा. कुमाई, बिहार), अशी मृतांची नावे आहेत.
बुलढाणा येथून मिरची घेऊन निघालेल्या डब्ल्यूबी २३ सी-८७०० क्रमांकांचा ट्रक नागपूरकडे भरधाव जात असतांना ट्रकचे नियंत्रण सुटले. अनुराधा पेट्रोल पंपजवळ उभ्या असलेल्या दोन मालवाहू वाहनांना त्याने जबर धडक दिली. अनियंत्रित ट्रक पेट्रोल पंप परिसरात शिरला. यामध्ये पेट्रोलपंपावरील कर्मचारी मंगेश पकडे जखमी झाला. तर अनियंत्रित ट्रकमधील चालक व क्लिनर जागीच ठार झाले. अपघातामुळे घटनास्थळावर एकच खळबळ माजली होती. पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्यांनी तातडीने नांदगांव पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.