शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

'दोन शासन निर्णय'; 'एक पत्र' तरीही आदिवासींची पदभरती का रखडली?

By गणेश वासनिक | Updated: September 8, 2024 19:08 IST

ट्रायबल फोरमचा सवाल, राज्य शासनाच्या सर्व मंत्रालयीन सर्व विभागांना निवेदन

अमरावती: राज्यात आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० पदांच्या भरतीसाठी यापूर्वी दोन शासन निर्णय आणि एक पत्र जारी केले आहे. एवढे नव्हे तर पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रालयीन विभागातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिवांना या पदभरतीची कार्यवाही विनाविलंब तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र हे निर्देश देऊन २२ दिवस लोटले तरी पदभरतीची कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे 'ट्रायबल फोरम' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्रालय गाठून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीद्वय, विविध खात्याचे मंत्री, मंत्रालयीन विभागातील प्रमुखांना निवेदन देऊन यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. ‘लोकमत’ने 'आदिवासी समाजाची विशेष पदभरती नेमकी कुणी रोखली?' या मथळ्याखाली २५ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

या वृत्ताची दखल 'ट्रायबल फोरम' संघटनेने घेतली आहे, हे विशेष. आदिवासी समाजाची विशेष पदभरती मोहीम राबविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने २१ डिसेंबर २०१९ व १४ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केले आहे. दोन शासन निर्णय निर्गमित करुनही विशेष पदभरतीची मोहीम राबविण्यात आली नाही. पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑगस्ट २०२४ रोजी एक स्वतंत्र पत्र जारी केले आहे. असे असताना आदिवासी समाजाची विशेष पदभरती मोहीम का राबविण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित करीत १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती मोहीम तात्काळ राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.केवळ १२३ पदांची भरतीअनुसूचित जमातींच्या राखीव जागेवर नियुक्ती मिळविली. परंतु नंतर मात्र जातप्रमाणपत्र अवैध ठरले, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करुन रिक्त जागा भरण्याचे आदेश २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आले होते. ही रिक्त पदे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीमेद्वारे भरायची होती. पण केवळ १२३ पदेच भरण्यात आली आहे. मुख्य सचिवांनीही दिली होती हमीराष्ट्रीय जनजाती आयोगासमोर राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी ८ ऑगस्ट २०२२ रोजी शपथपत्र देऊन मुख्यमंत्री व वित्त विभागाची मंजुरी घेऊन लवकरच अनुसूचित जमातीची विशेष पदभरती केली जाईल, अशी हमी आयोगासमोर दिली होती. याशिवाय शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची ५५ हजार ६८७ पदे रिक्त असल्याची ३१ ऑगस्ट २०२० ची स्थिती आयोगासमोर मांडली होती. आदिवासी समाजाने दुसऱ्याच्या ताटातील आमच्या ताटात वाढा, अशी मागणी कधीही आजपर्यंत केलेली नाही. फक्त संविधानाने दिलेले शासकीय सेवेतील घटनात्मक प्रतिनिधीत्व एवढाच विषय आहे. आमच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा भरुन आदिवासी समाजाला न्याय द्यावा.- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र

टॅग्स :Amravatiअमरावती