अमरावती जिल्ह्यात नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू; आईला भेटायला गेले होते..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:36 IST2020-09-14T22:36:12+5:302020-09-14T22:36:59+5:30
तिवसा तालुक्यातील शेंदोळा बु. येथे सूर्यगंगा नदीत पोहण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. दोघांचेही मृतदेह सायंकाळी ६ च्या सुमारास नदीबाहेर काढण्यात आले.

अमरावती जिल्ह्यात नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू; आईला भेटायला गेले होते..
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: तिवसा तालुक्यातील शेंदोळा बु. येथे सूर्यगंगा नदीत पोहण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. दोघांचेही मृतदेह सायंकाळी ६ च्या सुमारास नदीबाहेर काढण्यात आले.
शेंदोळा येथील गंगाधर लक्ष्मण गजभिये (४०) हे नागपुर येथे कामानिमित्त राहतात. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांच्या आईला सर्पदंश झाला. आईला पाहण्यासाठी ते नागपूर येथील एका मित्रासोबत गावी शेंदोळा येथे आले.
दरम्यान, सोमवारी दुपारी गजबे व त्यांचा ३० वर्षीय मित्र गावातीलच सूर्यगंगा नदीत आंघोळीसाठी आले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोलात शिरले. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी याबाबत महसूल व पोलिसांना माहिती दिली. सायंकाळी ग्रामस्थांच्या सहकायार्ने अमरावती येथील शोध व बचाव पथकाने दोन्ही मृतदेह शोधून नदीबोहर काढले. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान गजबे यांच्यासोबत मृत्यू पावलेल्या मित्राची ओळख पटू शकली नाही.हेमंत सरकटे, योगेश घाडगे, कौस्तुभ वैद्य, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, अर्जुन सुंदरडे, दीपक डोरस, संदीप पाटील, उदय मोरे , राजेंद्र शाहाकार, अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, वाहिद शेख यांनी हे रेस्क्यू यशस्वी केले.
अवघ्या वीस मिनिटात शोधले मृतदेह
शेंदोळा बु येथे दोन इसम बुडाल्याची माहिती मिळताच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचाव पथक घटनास्थळी दुपारी पाच वाजता पोहोचले व तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. रेस्क्यू टीममधील गोताखोरांनी पाण्यात उड्या मारून गळाच्या साह्याने अवघ्या पाच मिनिटात गजानन लक्ष्मणराव गजभियेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि दुसऱ्या अज्ञात इसमाचा मृतदेह पुढील पंधरा मिनिटात बाहेर काढला.