शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कार खदानीत पडून दोन तरुणांचा मृत्यू, तीन जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 16:16 IST

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमधून मध्यरात्री जेवण आटोपून दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवीत परत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पाणी भरलेल्या खदाणीत पडली

वाडी  -  नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमधून मध्यरात्री जेवण आटोपून दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवीत परत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पाणी भरलेल्या खदाणीत पडून चालक अविनाश मेश्राम व अविनाश पठाडे यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर झालेत. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वडधामना परिसरात ही घटना घडली.  पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अविनाश अनिल मेश्राम (२५)रा. रक्षा कॉलनी, काटोल रोड हा क्रुज गाडी क्रमांक एम.एच. ३१ डी.एन.९९९० ने मित्र अविनाश मार्कंड पठाडे (२४) रा. सुरेंद्रगड मज्जीद गिट्टीखदान नागपूर, नरेंद्र कानफाडे (२५)रा. हजारी पहाड, गिट्टीखदान, मनीष विरेंदर शर्मा (२६) रा. कळमेश्वर व बाबा ठाकूर (२४) सुरेंद्रगड कांचनमाला शाळेजवळ गिट्टीखदान यांच्यासह गोंडखैरीजवळील होटल स्काय गार्डन येथे शुक्रवारी रात्री जेवण करायला आले होते. तिथे त्यांनी मद्यपानही केले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास नागपूरकडे घरी परत जात असताना चालक अविनाश मेश्राम याने दारूच्या नशेत निष्काळजीपणे भरधाव वेगाने गाडी चालवीत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या किनारी भागाला घासत वडधामना परिसरातील कायरॉस हाटेलच्या समोरील पाण्याच्या खदाणीत पडली. ही बाब हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्याने घटनेची माहिती वाडी पोलिसांना कळविली.यानंतर वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु समोरचे दार उघडल्या न गेल्याने चालक अविनाश मेश्राम व त्याचा मित्र अविनाश पठाडे यांचा गाडीतच पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. यासोबतच रंजन कानफाडे, मनीष शर्मा, बाबा ठाकूर यांना गंभीर अवस्थेत पोलिसांनी बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी भांदविच्या कार चालकावर २७९, ३०४(अ), ३३८, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक श्यामराव कावनपुरे व आशिष लोणकर, सुनील कवडे, महेंद्र सानमांडे, संजय पांडे तपास करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र