Two-and-a-half year old Chimukkali torture; The accused is a minor | अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन

अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन

ठळक मुद्देनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अडीच वर्षीय चिमुकलीवर एका १७ वर्षीय अल्पवयीनाने शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना १५ फेब्रुवारी रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उघड झाली. याप्रकरणी विधिसंघर्षित बालकाविरूद्ध भादंविचे कलम ३७६, ३७६ (अ, ब) व पोस्को अन्वनये गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पीडित चिमुकलीची आई आंगण झाडत असताना चिमुकली रडतच घरी आली. विधिसंघर्षित बालकाचे नावही तिने पालकांकडे सांगितले. मुलीला न्याहाळल्यानंतर तिचेवर अत्याचार करण्यात आल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लोणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी त्या १७ वर्षीय बालकाला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Two-and-a-half year old Chimukkali torture; The accused is a minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.