तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा चेन्नईतील समुद्रात बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 19:59 IST2019-12-22T19:57:33+5:302019-12-22T19:59:29+5:30

ते चेन्नईला फिरायला गेले असता, सदर घटना घडल्याची माहिती मिळाली. 

Two Amravati youth drowned in Chennai | तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा चेन्नईतील समुद्रात बुडून मृत्यू 

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा चेन्नईतील समुद्रात बुडून मृत्यू 

ठळक मुद्देरविवारी दुपारच्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात चार मुलांचे पालक पोहोचले होते. दोन तरुण अंबागेट, तर दोन तरुण भाजीबाजार परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमरावती - शहरातील खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील दोन तरुणांचा चेन्नईतील समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. अमरावती येथून चार मुले बालाजी दर्शनासाठी गेले होते. तेथून ते चेन्नईला फिरायला गेले असता, सदर घटना घडल्याची माहिती मिळाली. 

रविवारी दुपारच्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात चार मुलांचे पालक पोहोचले होते. आमची मुले बालाजी दर्शनासाठी गेली असून, तेथून ते चेन्नईला फिरायला गेले. मात्र, तेथील समुद्रात दोघांचा मृत्यू झाला. तेथील पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यामुळे आम्हाला तेथे जायचे आहे, त्यासाठी आम्ही काय करावे व कसे जावे, यासंदर्भात त्यांनी पोलिसांना सल्ला मागितला. माहितीच्या आधारे खोलापुरी गेटचे दुय्यम ठाणेदार किशोर शेळके यांनी संबंधित पालकांना योग्य सल्ला दिला. त्या मुलांची नावे अद्याप पोलिसांनी उघड केली नाही. मात्र, दोन तरुण अंबागेट, तर दोन तरुण भाजीबाजार परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेसंदर्भात पालकांनी आम्हाला विचारणा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. पोलिसांच्या सल्ल्यानुसार ते पालक चेन्नईकडे रवाना झाले.

Web Title: Two Amravati youth drowned in Chennai