विक्की बाबरविरुद्ध दोनदा बलात्कारचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:34 AM2021-02-20T04:34:36+5:302021-02-20T04:34:36+5:30

अमरावती : मैत्रिणीला चाकुचा धाक दाखवून मारहाण करून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना गाडगेनगर ठाण्यांतर्गत अर्जुननगरजवळील टेलिफोन कॉलनीत १४ ...

Twice raped against Vicky Baber | विक्की बाबरविरुद्ध दोनदा बलात्कारचा गुन्हा

विक्की बाबरविरुद्ध दोनदा बलात्कारचा गुन्हा

Next

अमरावती : मैत्रिणीला चाकुचा धाक दाखवून मारहाण करून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना गाडगेनगर ठाण्यांतर्गत अर्जुननगरजवळील टेलिफोन कॉलनीत १४ फेब्रवारी व्हॅलेंटाईन- डेच्या दिवशी घडली.

या प्रकरणातील यशोदानगरनजीक असलेल्या कमल कॉलनीतील रहिवासी आरोपी विक्की रघुनाथ बाबर(३०) याच्यावर तीन वर्षांत दुसऱ्यांदा बलात्कारचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. तीन वर्षांपूर्वी एका युवतीने त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्यावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा नोंदविला होता. आरोपी व फिर्यादीमध्ये समझोता झाल्याने काही काळानंतर न्यायालयाने सदर प्रकरण खारीज केल्याची माहिती आहे.

विक्की बाबर या आरोपीने पीडित २८ वर्षीय युवतीला अर्जुननगरजवळील टेलिफोन कॉलनी येथे प्रेमदिनालाच तिच्या घरी जावून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. तिला मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी त्याच्यावर भादंविचे कलम ३७६ (२), (एन), ४५२, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. मात्र, २४ तासानंतरही आरोपी अटक झाला नाही. आरोपी पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title: Twice raped against Vicky Baber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.