शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

चुकीच्या धोरणामुळे उद्योग व्यापारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 1:38 AM

नोटबंदी, जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे व शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग व व्यापारी अडचणीत आले आहे. मात्र, शासन पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देरावसाहेब शेखावत यांची टीका : ‘काँग्रेस आपल्या दारी’ अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटबंदी, जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे व शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग व व्यापारी अडचणीत आले आहे. मात्र, शासन पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी गुरुवारी केली.व्यापारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्यावतीने ‘काँग्रेस आपल्या दारी अभियान’ गुरुवार, १७जानेवारीपासून राबविण्यात येत आहे. सकाळी १०.३० वाजता दरम्यान माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या काँग्रेसनगर येथील निवासस्थानी काही निवडक व्यापाऱ्यांची व काँग्रेसच्या पदाधिकाºयांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याप्रसंगी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय वाघ, पुरुषोत्तम मुंदडा, शहर काँग्रेसचे महासचिव सुरेंद्र देशमुख, मनोज भेले, आनंद बाबू भांबोरे, राजेंद्र लुनावत, राधेश्याम लढढा, सुरेश रताव, ओमप्रकाश चांडक, नवनीत मोहोड, बापूशेठ खंडेलवाल, अजय छतवाणी अनिल, माधवगढिया, राजेंद्र अन्सारी यांच्यासह अनेक व्यापाºयांची येथे उपस्थिती होती. नोटबंदी, जीएसटी, आॅनलाईन व्यापार व एफडीआय, प्लॅस्टिक बंद व कॅशलेस व्यवहार व बँकींमुळे अनेकांच्या अडचणी वाढल्याचा सुरू बैठकीत निघाला आहे.आॅनलाईन व्यापार व एफडीएमुळे लहान व्यापारी संपले आहेत. चुकीच्या धोरणामुळे व्यापार व उद्योग डबघाईस आले. शासनाने लादलेल्या प्लास्टिक बंदीमुळे राज्यातील लघु उद्योग व्यापार संपुष्टात आले. तसेच बेरोजगारी वाढली. कॅशलेस व्यवहार बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार अडचणीत आले. देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याची प्रतिक्रिया सुरेंद्र देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. व्यापार, शेतकरी व किरकोळ व्यावसाय मोडकळीस आलेला आहे महाराष्ट्रातील लघुउद्योग संपुष्टात येत असून बेरोजगारीत वाढ होत आहे तसेच यामुळे व्यापारी कारखानदार विद्यार्थी व जनता त्रस्त झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाला शिकण्यासाठी हे अभियान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काँग्रेस आपल्या दारी येत असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.नोटबंदी हा देशाला झटकानोटबंदी हा देशाला पहिला झटका होता. नोटबंदीमुळे सरकारला काय लाभ मिळाला माहिती नाही. त्या कारणाने सर्व व्यापार कोडमोडले. कुठलीही जनजागृती न करता पर्यावणाच्या नावावर प्लॉस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला. प्लॅस्टिक बंदी झाल्याने त्यावर अवलंबुन असणारे अनेक उद्योग बंद झाले. यामुळे बेरोजगारी वाढली. शासन उद्योगही आणत नाही. व रोजगारही देत नाही. जे उद्योग सुरु आहेत. ते अशा जाचक निर्णय घेवून बंद पडत आहेत. मात्र अंबानी, चोकसी सारख्यांची पावते. लहान व्यापाºयांकडे उद्योगांकडे मात्र शासनाची लक्ष नसल्याचा आरोप यावेळी लोकमतशी बोलताना माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केला आहे.

टॅग्स :GSTजीएसटीNote Banनोटाबंदी