शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बालमृत्यू ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न करा - आरोग्य संचालक    

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 21:28 IST

मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू गतवर्षापेक्षा ३५ टक्कांनी कमी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे व एकही मातामृत्यू होऊ न देण्याचे निर्देश राज्याचे आरोग्य संचालक संजीव कांबळे यांनी दिले

अमरावती -  मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू गतवर्षापेक्षा ३५ टक्कांनी कमी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे व एकही मातामृत्यू होऊ न देण्याचे निर्देश राज्याचे आरोग्य संचालक संजीव कांबळे यांनी चिखलदरा येथे रविवारी मेळघाटातील डॉक्टरांच्या आढावा बैठकीत दिले. सोबतच आदिवासींसोबत समन्वय साधून उपायोजना करण्याच्या सूचना केल्या.  येत्या ४ जुलैपासून नागपुरात होणाºया पावसाळी अधिवेशनाचा धसका नेहमीप्रमाणे मुंबई मंत्रालयातील अधिकाºयांनी घेतल्याचे  चित्र रविवारी मेळघाटात पाहायला मिळाले. आरोग्य विभागाच्या बैठकीला आलेल्या आरोग्य संचालकांनी नागपूरवरून मुंबईचे विमान गाठण्यासाठी दीड तासातच आपली उपस्थिती दर्शवून आणि मेळघाटातील एकाही गावाला भेटी न देता निघून जाण्यात धन्यता मानली. बैठकीला आरोग्य विभागाचे सहायक संचालक डिग्गीकर, उपसंचालक राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक आसोले, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, प्राचार्य दिलीप रणमाळेसह मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील भरारी पथक, आरोग्य केंद्राचे डॉक्टर, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे तसेच आदिवासींमध्ये जनजागृती करून त्यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचेही आरोग्य संचालकांनी या बैठकीत सांगितले.

धारणी, चिखलदºयात पोषण, पुनर्वसन केंद्र पावसाळ्याच्या दिवसात मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढते. अशातच धारणी आणि चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात पोषण व पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. संदर्भसेवा उपचारात हयगय न करता, एकत्र येऊन काम करा. गतवर्षीच्या तुलनेत ३५ टक्क््यांनी कुपोषणाने मृत्यूूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांना परिश्रम घेण्याचेही दिलीप कांबळे यांनी आदेश दिले. 

एकाही आदिवासी पाड्याला भेट नाही नागपुरातील पावसाळी अधिवेशनाचा धसका आरोग्य विभागानेसुद्धा घेतल्याचे रविवारच्या बैठकीत स्पष्टपणे जाणवत होते विरोधकांच्या हाती राज्यातील आदिवासी भागांच्या कुपोषण व इतर समस्या लागू नये, यासाठी राज्याचे आरोग्य संचालक मेळघाटात बैठकीला आले. त्यांनी मार्गातील धामणगाव गढी वगळता मेळघाटातील एकाही आरोग्य केंद्र वा उपकेंद्राला भेट दिली नाही. थेट चिखलदरा गाठून तास-दीड तास बैठकीला हजेरी लावली आणि विमान गाठण्यासाठी नागपूरला निघून गेले. यादरम्यान भरारी पथकातील डॉक्टरांनी आपल्या वेतनासह इतर समस्या त्यांना कळविल्या. मेळघाटातील डॉक्टरांच्या सात रिक्त जागा असण्याच्या मुद्द्यावर त्यांनी कुठले आदेश दिले, हे मात्र कळू शकले नाही. आरोग्य संचालकांनी मेळघाटातील दुर्गम, अतिदुर्गम भागात जाऊन प्रत्यक्ष आदिवासींसोबत आरोग्य विषयावर चर्चा करणे क्रमप्राप्त होते. मात्र, तसे झाले नाही.

टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्य