शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विजयच्या पत्रातून उघड होणार सत्य

By admin | Updated: April 5, 2017 00:05 IST

जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या विरुळपूर्णा येथील विजय नांदणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेला १२ दिवस झाले आहेत.

विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी सुमित हरकुट चांदूरबाजारजिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या विरुळपूर्णा येथील विजय नांदणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेला १२ दिवस झाले आहेत. मात्र अद्याप या घटनेतील सत्य अद्याप उघड व्हायचे आहे. याप्रकरणी शाळेतील मुख्याध्यापक अमोल माकोडे व वर्गशिक्षक शिंगणे यांची दररोज चौकशीसाठी ठाण्यात बोलावले जात आहे. मृत्यूपूर्व विजयने लिहिलेल्या पत्रातील अक्षराचा तपासणी अहवाल मिळाल्यानंतरच या घटनेतील सत्य समोर येणार आहे. तर मृत विजय नांदणे व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील विरुळपूर्णा या गावात इयत्ता नववीतील १५ वर्षीय विद्यार्थी विजय नांदणे याने येथील एका शेतशिवारात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २४ मार्च रोजी उघडकीस आली होती. विजय जवळ मृत्यूपूर्व लिहिलेले एक पत्र आढळून आले होते. वर्गातील चार विद्यार्थी त्याला चिडवीत होते, तर शिक्षक मारहाण करीत असल्याने कंटाळून विजयने आत्महत्या केल्याची तक्रार त्याचे वडील सुधाकर नांदणे यांनी आसेगाव पोलिसांत केली होती. या प्रकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्चला मृत विजयच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी चिडविले होते. याची तक्रार त्याने वर्गशिक्षक शिंगणे व मुख्याध्यापक अमोल माकोडे यांच्याकडे केली होती. यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांनी चिडविणाऱ्या चारही विद्यार्थ्यांसह मृत विजयला कानशिलात लगावत शिक्षा केली होती. याची माहिती विजयने आईला दिली होती. त्याच्या आईने वर्गशिक्षकांची भेट घेऊन या प्रकारची विचारणा केली होती. दुसऱ्या दिवशी विजय नेहमीप्रमाणे शाळेत गेला. मात्र मधल्या सुटीनंतर तो घरी परत आला व एका शेतात जाऊन त्याने विष प्राशन केले. आत्महत्या केल्याच्या दिवशी विजयला मारले नव्हेत, असा बयाण शाळेच्या शिक्षकांनी दिला आहे. मात्र असे काय घडले की, यामुळे विजयला आत्महत्या करावी लागली याचा अद्याप पत्ता लागला नाही. मृत विजय जवळ मिळालेले पत्रदेखील पोलिसांसाठी संशयास्पद आहे. विजयची अक्षरे व पत्रात लिहलेल्या अक्षरांमध्ये असलेले साम्य पडताळण्यासाठी हस्तलिखित तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे२४ मार्चला आत्महत्येनंतर शामकांत बोबडे विद्यालय ४ दिवस बंद असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात निवेदन विजयच्या वडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. घटनेचा तपास आसेगावचे पीआय अजय आखरे करीत आहे. - तर आत्महत्या टळली असतीविजय नांदणे याच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे. विजयच्या आत्महत्येची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करीत त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांविषयी अनेक तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची योग्य समजूत घातली असती तर विजय आज जिवंत असता असेही मत गावातील अनेकांनी नोंदविले. विजय नांदणे याच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. मृत्यूपूर्व त्याने लिहिलेल्या पत्रातील अक्षरे त्याचीच आहेत काय? याची तपासणी करण्यासाठी आम्ही पाठविली आहे. तपासणीचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करू.- अजय आखरे, पोलीस निरीक्षक, आसेगाव