कोळशाने भरलेला ट्रक घुसला बसस्टँडच्या रसवंतीमध्ये; अमरावती जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 20:47 IST2020-07-03T11:34:30+5:302020-07-03T20:47:27+5:30
शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास कारंजा घाडगे येथील रसवंतीगृहात अनियंत्रित ट्रक घुसला.

कोळशाने भरलेला ट्रक घुसला बसस्टँडच्या रसवंतीमध्ये; अमरावती जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन बसस्टँडवरील रसवंतीच्या दुकानात शिरल्याची घटना येथे घडली.
शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास कारंजा घाडगे येथील रसवंतीगृहात अनियंत्रित ट्रक घुसला. कळमेश्वरकडून केरळकडे जाणारा ए.पी. १६ टी डी ९२४९ हा ट्रक कोळसा वाहून नेत होता. पहाटे ३ च्या सुमारास भरधाव वेगावर नियंत्रण न राखता आल्याने हा ट्रक बस स्टँडवरील आई तुळजाभवानी रसवंतीत शिरला. रात्रीची वेळ असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हा ट्रक इतका भरधाव वेगाने जात होता की, त्याच्या धडकेने बसस्टँडची सुरक्षा भिंत तुटली.
या धडकेने रसवंतीचे मोठे नुकसान झालेआहे. ट्रक चालक फरार असून, ट्रकच्या क्लीनरने ब्रेक निकामी झाल्याचे कारण सांगितले आहे.