'समृद्धी'वर दोघांचा बळी, अपघाताची मालिका सुरूच

By प्रदीप भाकरे | Updated: August 16, 2023 14:11 IST2023-08-16T14:05:28+5:302023-08-16T14:11:11+5:30

चालकाला डुलकी लागली अन् अनर्थ घडला

truck accident on Samruddhi mahamarg, two killed | 'समृद्धी'वर दोघांचा बळी, अपघाताची मालिका सुरूच

'समृद्धी'वर दोघांचा बळी, अपघाताची मालिका सुरूच

धामणगाव रेल्वे (अमरावती) : नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाला डुलकी आल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला.  यात चालक व वाहक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री एक वाजता समृद्धी महामार्गावर मांजरखेड गावाजवळ घडली.

चालक मोहम्मद फैजान मोहम्मद अली (४८) व वाहक मोहम्मद ममताज मोहम्मद शेख (४६, दोन्ही रा. शेरघाटी जिल्हा. बोधगया, बिहार) अशी मृतकांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: truck accident on Samruddhi mahamarg, two killed