शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: December 9, 2015 00:24 IST

धारणी नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर नवनिर्मित कार्यकारिणीची पहिली विशेष सभा विविध कारणांनी गाजली. ३० नोव्हेंबरला पहिल्या ....

धारणीतील अतिक्रमण : ४१ ऐवजी ३६ फुटांच्या रस्त्याचा निर्णयश्यामकांत पाण्डेय धारणीधारणी नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर नवनिर्मित कार्यकारिणीची पहिली विशेष सभा विविध कारणांनी गाजली. ३० नोव्हेंबरला पहिल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिला शक्ती आरुढ झाल्याने जनसामान्यात विकासाच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु ही आशा औटघटकेचा ठरल्याचा प्रत्यय शनिवारी झालेल्या पहिल्याच विशेष सभेत दिसून आले. १ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्ग असणाऱ्या अमरावती-बुऱ्हाणपूर मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजमाप केले. या मार्गाला कमीत कमी ८२ फुटांपर्यंत मोकळे करण्याचा नगरपंचायतीचाही मानस होता. त्या दृष्टीने प्रशासक कृष्णा भामकर यांनी पत्रे देऊन १४ डिसेंबर रोजी राज्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचा मुहूर्तही काढला. परंतु नगरपंचायतीत सत्तारुढ झालेल्या नगरसेवकांना अतिक्रमणमुक्तीचा हा फंडा आवडला नाही. त्यांनी ८२ ऐवजी ७२ फुटापर्यंत रस्ता मोकळा करण्याचा निर्णय नगरपंचायतच्या सभेत घेण्यात आला. कोणत्याही शहराचा चेहरामोहरा हा तेथील उत्कृष्ट रस्त्याने ओळखला जातो. धारणीतून जाणाऱ्या अमरावती-बुऱ्हाणपूर या मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेपर्यंत बेधूंद अतिक्रमण थाटण्यात आले. कापडी शेड, टीनशेड व त्यासमोर हातठेलावाल्यांचा अवाजवी अतिक्रमणाने हा मार्ग वेढला गेला आहे. त्यातही आॅटो व काळी-पिवळीचालकांसह अवैधरीत्या विना परवाना धावणारे गाड्यांचे मुख्य मार्गावरील अस्तव्यस्त उभ्या राहत असल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे एबी रोड मोकळा करण्याच्या निर्णयाचा जनतेने स्वागत केले होते. मात्र याच मार्गावरील काही नगरसेवकांचे व त्यांच्या नातलगांचे दुकाने अतिक्रमणात येत असल्याने अशा अतिक्रमणधारकांनी महामार्गावरील अतिक्रमणाचा मार्गाचे रुंदी ८२ फुटांवरून ७२ फुटांवर आणण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजीच्या अतिक्रमण मोहिमेला नगरसेवक कितपत सहकार्य करतात, याकडे लक्ष लागले आहे.