शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नको! नामांकित शाळा संचालकांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 16:31 IST

द-याखो-यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची योजना राज्य शासनाने सुरू केली. मात्र, आदिवासी विद्यार्थी असल्यास अन्य संवर्गातील विद्यार्थी प्रवेश घेणार नसल्याने काही नामांकित शाळांच्या संचालकांनी ‘आम्हाला आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नको’ या आशयाचे पत्र आदिवासी विकास विभागाला दिले आहे.

- गणेश वासनिक  अमरावती - द-याखो-यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची योजना राज्य शासनाने सुरू केली. मात्र, आदिवासी विद्यार्थी असल्यास अन्य संवर्गातील विद्यार्थी प्रवेश घेणार नसल्याने काही नामांकित शाळांच्या संचालकांनी ‘आम्हाला आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नको’ या आशयाचे पत्र आदिवासी विकास विभागाला दिले आहे.राज्याच्या आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर या चार अपर आयुक्त कार्यालयांच्या अधिनस्थ आदिवासींसाठी विविध योजना, उपक्रम राबविले जातात. गत काही वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी आणि ग्रामीण भागातील नामांकित शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. शहरात प्रतिवर्ष प्रतिविद्यार्थी ५० हजार, तर ग्रामीण भागात ४० हजार रुपयांचे अनुदान शासनातर्फे शाळांना दिले जाते. या योजनेच्या आकर्षणातून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होती. मात्र, कालांतराने नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेत अपहार, बोगस शाळांची निवड, आदिवासी विद्यार्थ्यांना लांब पल्ल्याच्या शाळांमध्ये प्रवेश देणे, शाळांत सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रकरण अशा एक ना अनेक बाबी पुढे आल्यात. अशातच आदिवासी विद्यार्थी प्रवेशित झालेल्या शाळांमध्ये गलेलठ्ठ शैक्षणिक शुल्क भरणाºया अन्य संवर्गातील पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश नाकारले आहेत. त्यामुळे काही नामांकित शाळांच्या संचालकांनी ‘आम्हाला आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नको’ असे पत्र आदिवासी विकास विभागाला दिले आहे. गतवर्षी प्रत्येक अपर आयुक्त कार्यालयातंर्गत नामांकित शाळांमध्ये पाच हजार विद्यार्थी प्रवेशाचे लक्ष्य होते. मात्र, केवळ १९४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत. ही स्थिती राज्यभराची आहे. नामांकित म्हणून मिरवणाºया काही शाळांचा कारभार पाहून आदिवासी बांधवांनी महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्यांना शिकविण्याची मानसिकता बनवली आहे. दरम्यान, प्रारंभी आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळावे, यासाठी प्रक ल्प कार्यालय, अपर आयुक्त, आयुक्त ते मंत्रालय अशा पायºया झिजवणाºया नामांकित शाळा संचालकांना आता प्रवेश नको म्हणणारे पत्र देण्याची वेळ का आली, हादेखील संशोधनाचा विषय आहे.

सात पीओ स्तरावर १९४६ विद्यार्थ्यांचे प्रवेशआदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयस्तरावर सात प्रकल्प कार्यालयांनी यावर्षी १९४६ आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाला प्रवेश मिळवून दिला. आहे. एकूण ४९ शाळा असून,  धारणी २३५, अकोला २४९, पुसद २०६, पांढरकवडा ९९, किनवट ८४, औरंगाबाद ५७० आणि कळमनुरी ५०३ अशी प्रकल्प कार्यालयनिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी आहे.

नामांकित शाळांची निवड ही शासनस्तराहून होते. त्याचे तीन टप्पे असतात. विद्यार्थ्यांच्या अर्जानुसार प्रवेश दिला जातो. काही शाळा लांब पल्ल्याच्या असल्याने तेथे विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत. विद्यार्थ्याचे प्रवेशाबाबतची प्रक्रिया ही प्रकल्प कार्यालयस्तराहून चालते. त्यानुसार शाळा संचालकांनी पत्र दिले असेल.- गिरीश सरोदेअपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :SchoolशाळाAmravatiअमरावती