शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा नागपूर येथे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 18:50 IST

नेत्यांच्या शाळेत सुविधांचा अभाव

अमरावती: अमरावती तालुक्यातील जामली आर येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा नागपूर येथे शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. जामली आर येथील विद्यार्थी हा आजारी असल्याचे सांगण्यात आले. सुभाष सोमाजी धिकार (१४, रा. बोरदा, ता. चिखलदरा) असे नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने मेळघाटातील आश्रमशाळा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. 

गौरखेडा बाजार स्थित गाविलगड शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जामली आर येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत सुभाष शिकत होता. मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे या संस्थेचे सचिव आहेत. काही दिवसांपासून आजारी असल्याने सुभाषला ५ जानेवारी रोजी नजीकच्या टेम्ब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेथून पुढे अचलपूर व अमरावती येथे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने ८ जानेवारी रोजी नागपूर येथे हलविले. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याला ताप, पीलिया आणि किडनीवर सूज आल्याचे सांगण्यात आले. सुविधांचा अभाव, आठवड्यात दुसरा मृत्यू

मेळघाटात आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याने आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आंघोळीसह प्रात:विधीसाठी नदी-नाल्यांचे पाणी वापरावे लागते. दूषित पाणी प्यावे लागत असल्याने आजाराला आमंत्रण मिळते. याच आठवड्यात धारणी तालुक्यातील टिटंबा येथे एका विद्यार्थ्याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला.

जामली आर येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी आजारी होता. त्याला नागपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. - मिताली सेठी, प्रकल्प अधिकारी, धारणी

टॅग्स :Deathमृत्यूAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थी