शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

आदिवासी शेतकऱ्यांभोवती अवैध सावकारीचा पाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी परतवाडा येथील सावकारांकडे गहाण ठेवलेले दागिने शासनाने मंजूर केलेल्या कर्जप्रकरणानंतर परत ...

ठळक मुद्देदीड हजार वंचित : पात्र लाभार्थींना गहाण दागिने परत

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी परतवाडा येथील सावकारांकडे गहाण ठेवलेले दागिने शासनाने मंजूर केलेल्या कर्जप्रकरणानंतर परत करण्यात आले आहेत. दीड हजारांवर लाभार्थी मात्र अजूनही वंचित आहेत. सोमवारी चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर, उपनिबंधक अच्युत उल्हे यांच्या उपस्थितीत ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना त्यांचे गहाण दागिने परत दिले गेले. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करून, त्यांनी परतवाडा येथील सावकारांकडे गहाण ठेवलेले दागिने परत करण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर यांनी केली होती. अशिक्षित, पेचात सापडलेल्या आदिवासींना मोठ्या प्रमाणात फसविले जात असल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. सावकाराच्या गहाण पावत्या शेतकºयांकडे असताना, शासनदप्तरी ते गहाण सोडविण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत येथील सहायक निबंधक कार्यालयात आदिवासी शेतकऱ्यांसह सभापतींनी धडक दिली.‘लोकमत’च्या वृत्ताची आमदारांकडून गंभीर दखलआदिवासी शेतकरी सावकारी पाशात अडकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर आमदार राजकुमार पटेल यांनी गत आठवड्यात चिखलदरा तहसील कार्यालयात बैठक बोलावली. तहसीलदार माया माने, मंडळ अधिकारी व काही आदिवासी शेतकरी उपस्थित होते. अपात्र आदिवासी शेतकºयांना पात्र करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.केवळ ६७ पात्रदीड हजार अपात्रचिखलदरा तालुक्यातील दीड हजारांपैकी केवळ ६७ आदिवासी शेतकऱ्यांना सावकारी कर्जात पात्र ठरविण्यात आले आहे, तर दीड हजारांवर शेतकऱ्यांपैकी ६०० पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांनी सावकाराकडील आपले गहाण सोडून देण्यात आल्याचा खोटा शेरा लिहिण्यात आला. प्रत्यक्षात त्यांच्याकडे गहाण पावत्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे कुठेच नाव नाही, हे विशेष. ६७ पात्र शेतकऱ्यांना त्यांचे गहाण सोमवारी उपनिबंधक कार्यालयात परत करण्यात आले. यावेळी दादा खडके, प्रकाश जामकर, देविदास कोगे, भीमराव काळे आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी