आज पुन्हा 'धम्माल गल्ली'
By Admin | Updated: April 26, 2015 00:26 IST2015-04-26T00:26:39+5:302015-04-26T00:26:39+5:30
'धम्माल गल्ली.' नवखी वाटावी अशी ही संकल्पना. आम्ही ती आणलीय खास अमरावतीकरांसाठी.

आज पुन्हा 'धम्माल गल्ली'
आबालवृध्दांसाठी अफलातून आयोजन : जिल्हा स्टेडियमवर जरूर या !
अमरावती : 'धम्माल गल्ली.' नवखी वाटावी अशी ही संकल्पना. आम्ही ती आणलीय खास अमरावतीकरांसाठी. रोजच्या दगदगीतून काही हसरे क्षण वेचता यावेत यासाठी. शीण घालवून अंतर्नादाच्या तालावर थिरकता यावे म्हणून...
जिल्हा स्टेडियमवर जल्लोषाचा कैफ चढलेले, आनंदाच्या खुमारीत रमलेले मस्तमौला बघण्यासाठी, आंतरमनाच्या हाकेला ओ देण्यासाठी रविवारी सकाळी सात वाजता आपण सर्व जरूर या. सहकुटुंब या. 'लोकमत'तर्फे आयोजित या आनंदोत्सवात सहभागी व्हा.
हे आहे वैशिष्ट्य
मेघे इंजिनिअरिंगच्या चमुची गिटार आणि तबल्याची जुगलबंदी, थुम्बा डान्स, हव्याप्र मंडळाचे मार्शल आर्ट, लाठीकाठी, ज्युडो कराटे आदींचे सादरीकरण, पोद्दार शाळेच्या चमुची ब्रिक रेस, लेझिम पथक, चमचा लिंबू शर्यत, स्केटिंग, म्युझिकल चेअर, रिंग मॅजिक, टॅटू रंगविण्याचे प्रयोग, पोत्यात पाय बांधून धावण्याची शर्यत, रस्सीखेच, सायकल रेस, नेचर आॅफ आर्ट, स्केटिंग, गल्ली क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल, लॉन टेनीस, आर्चरी, हॅन्डबॉल, फ्लॅश मॉब, जनजागृती पथनाट्य, फुगडी, लगोरी, मामाचे पत्र हरविले, आंधळी कोशिंबिर, कबड्डी आणि खो-खो असे मराठमोळे खेळ सादर केले जातील.
अधिक माहितीसाठी
संपर्क क्रमांक -९९२२४२७७९४, ९९२२४४२०५८