परतवाड्याच्या विशेष तिवारीचे द्विशतक, 37 चौकार, भंडा-याविरुद्ध केला पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:08 IST2017-12-12T18:08:30+5:302017-12-12T18:08:41+5:30

अमरावती : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित १५ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत परतवाड्याच्या विशेष तिवारीने नाबाद २०० धावा काढून विक्रम नोंदविला.

Tiwari's special Tiwary's double century, 37 fours, and Bhadra - | परतवाड्याच्या विशेष तिवारीचे द्विशतक, 37 चौकार, भंडा-याविरुद्ध केला पराक्रम

परतवाड्याच्या विशेष तिवारीचे द्विशतक, 37 चौकार, भंडा-याविरुद्ध केला पराक्रम

अमरावती : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित १५ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत परतवाड्याच्या विशेष तिवारीने नाबाद २०० धावा काढून विक्रम नोंदविला. त्याच्या नाबाद द्विशतकाच्या बळावर अमरावती संघाने ४० षटकांत ४ बाद ३३३ धावा कुटल्या.

शहरातील एचव्हीपीएम मैदानावर अमरावती विरुद्ध भंडारा सामन्यात अमरावती संघाकडून खेळताना विशेषने १२६ चेंडूत ३७ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने २०० धावा चोपल्या. यष्टिरक्षक असलेल्या विशेषने प्रतिस्पर्धी संघाच्या तीन फलंदाजांना यष्टिचितदेखील केले.
अमरावती संघाने पहिली विकेट गमावल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या विशेषने सुरुवातीपासूनच चौफेर फटकेबाजी केली.

भंडा-याच्या सर्वच गोलंदाजांविरुद्ध विशेषने जोरदार शॉट लावले. डावातील निम्मे चेंडू तो खेळला. उर्वरित चार फलंदाजांनी १०० धावा काढल्या. यात यश मेथवानीचा वाटा नाबाद ४६ धावांचा होता. ३३ धावा अतिरिक्त मिळाल्या. त्याच्या दुहेरी कामगिरीमुळे त्याला अमरावतीचा धोनी अशी उपाधी मिळाली आहे.

Web Title: Tiwari's special Tiwary's double century, 37 fours, and Bhadra -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.