TIJ festival of the Banjara community | बंजारा समाजाच्या तीज उत्सवाची सांगता

बंजारा समाजाच्या तीज उत्सवाची सांगता

ठळक मुद्देपारंपरिक महोत्सव : शहरातील हजारो बांधवांसह भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्रावणात बंजारा समाजाच्या 'तीज' या सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी उत्साहात समारोप झाला. स्त्रिया व मुलींनी हिरीरीने सहभाग घेत मृत्याचा फेर धरला. यामध्ये खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर यांनी सहभाग नोंदविला, हे विशेष.
‘मनं लोवडी दरादरे वीर, आज म चाली रे...’ या गाण्याच्या ओळी मनाला चटका लावून गेल्या. आता आपण पुन्हा वर्षभर भेटणार नाही, ही विरहाची जाणीव तर पुन्हा भेटीची उत्कटता त्यातून व्यक्त होते. शहरात वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरिता स्थायिक झालेला बंजारा समाज आपले सांस्कृतिक वेगळेपण आजही जपत आहे. तांड्याचे प्रमुख नायक प्रल्हाद चव्हाण, राम पवार यांच्या मार्गदर्शनात १७ आॅगस्ट रोजी तीज महोत्सवाला प्रारंभ झाला.
त्यानंतर साईनगर, गोपालनगर, शंकरनगर, अर्जुननगर, व्हीएमव्ही परिसर, रविनगर व मंगलधाम परिसर या भागात आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात शहरातील शेकडो महिला व मुली सहभागी झाल्यात. या कालावधीत शहरातील बंजारा बांधव आनंदाने भारून गेले होते. गायीगुरांचे पालन करणाºया बंजारा समाजात श्रीकृष्णांची श्रद्धेने पूजा केली जाते. २४ आॅगस्ट रोजी गणगौर, ढंबोळीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीकृष्ण व राधेची पूजा करून पारंपरिक नृत्य-गाणे यांनी वातावरण मंगलमय झाले होते.
२५ आॅगस्ट २०१९ रोजी विद्यापीठ मार्गावरील संस्कार लॉन आणि दस्तूरनगर स्थित कमल प्लाझा येथे या उत्सवाची सांगता झाली. खासदार नवनीत राणा व आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय राठोड, एम.एच. राठोड आदी उपस्थित होते.
व्यासपीठावर प्राचार्य अमरसिंग राठोड, महानगर तांडा नायक राम पवार, प्रल्हाद चव्हाण, चंदनसिंग राठोड, प्राचार्य जयंत वडते, प्राचार्य विजय राठोड, जयसिंग राठोड, उपकुलसचिव प्रवीण राठोड, उपकुलसचिव दादाराव चव्हाण, दयाराम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, मोतीलाल जाधव, अजाबराव राठोड, कारभारी हिरालाल जाधव, प्राचार्य पंडित राठोड, रणजित चव्हाण, नामदेव जाधव, विजय आडे, हरीश राठोड, श्रावण जाधव, रमेश राठोड, नामदेव आडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: TIJ festival of the Banjara community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.