अमरावतीत पूर्णा नदीच्या डोहात बुडून तीन तरुणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 10:28 IST2017-09-26T10:28:26+5:302017-09-26T10:28:31+5:30

अमरावतीतील चांदूर बाजार परिसरात पूर्णा नदीच्या डोहात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

Three youths die drowning in the river of Amravati, in the river Purna | अमरावतीत पूर्णा नदीच्या डोहात बुडून तीन तरुणांचा मृत्यू 

अमरावतीत पूर्णा नदीच्या डोहात बुडून तीन तरुणांचा मृत्यू 

चांदूर बाजार (अमरावती) -  पूर्णा नदीच्या डोहात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  अमरावतीतील चांदूर बाजार तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशाच्या आठनेर पोलीस स्टेशन हद्दीतील बेलकुंड येथील ही घटना आहे. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. 

मृतांमध्ये थुगाव येथील दोन तर शिरजगाव कसबा येथील एका युवकांचा समावेश आहे. मृत तीन युवक आपल्या सात मित्रांसह वाढदिवस साजरा करण्यासाठी धार्मिक स्थळ बेलकुंड येथे गेले होते. अनिकेत भारती, रणजीत लंगोटे, हर्षचल आढलक अशी मृताची नावे आहेत. या घटनेमुळे  त्यांचे मित्र धास्तावले आहेत. यातील एक मित्राला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा शोध अमरावती व आठणेरे पोलीस घेत आहेत. नदीपात्रालगतच्या सर्व गावात यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Three youths die drowning in the river of Amravati, in the river Purna