शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मेळघाटाने अनुभवले तीन आठवड्यांनंतर सूर्यदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:29 IST

मेळघाटात तब्बल तीन आठवड्यांनंतर शनिवारी सूर्यदर्शन झाले. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जीवनमान विस्कळीत झाले होते. सततची झड राहिल्याने कपडे धुण्याचा व वाळविण्याची अडचण निर्माण झाली होती. ती शनिवारी-रविवारी दूर झाली.

ठळक मुद्देपूर ओसरला : जिल्ह्यात १११ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी/चिखलदरा: मेळघाटात तब्बल तीन आठवड्यांनंतर शनिवारी सूर्यदर्शन झाले. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जीवनमान विस्कळीत झाले होते. सततची झड राहिल्याने कपडे धुण्याचा व वाळविण्याची अडचण निर्माण झाली होती. ती शनिवारी-रविवारी दूर झाली. दरम्यान दुपारपासून शेतातील डवरणी व अन्य कामांना नव्याने सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.शनिवारच्या सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. धारणीत १ जून ते १० आॅगस्ट या कालावधीत अपेक्षित असलेल्या ६७६ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात ९०९.५ मिमी अर्थात १३४.६ टक्के पाऊस पडला. या विक्रमी पावसामुळे २०२० च्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भसणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सिपना, गडगा, तापी, खंडू या मोठ्या नद्यांसह लहान नद्या व नाले दुथडी भरून वाहत होते. सिपना व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. शनिवारी पूर ओसरल्यानंतर दळणवळण सुरळीत झाले. मात्र, सलग दुसºया दिवशी अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. शनिवारी सूर्यदर्शनामुळे नागरिकांना मुक्त संचार करण्यास वाव मिळाला. चिखलदरा तालुक्यात मान्सूनच्या ७१ दिवसात ८९९.३ मिमीच्या तुलनेत प्रत्यक्षात १०७३ मिमी ( ११९.४ टक्के) पावसाची नोंद झाली.

टॅग्स :Melghatमेळघाटriverनदी