सोलर पॅनेल चोरांची तिकडी गजाआड

By प्रदीप भाकरे | Updated: January 21, 2023 14:29 IST2023-01-21T14:29:02+5:302023-01-21T14:29:13+5:30

आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या

Three solar panel thieves arrested in amravati | सोलर पॅनेल चोरांची तिकडी गजाआड

सोलर पॅनेल चोरांची तिकडी गजाआड

अमरावती : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सोलर प्लांटच्या बॅटऱ्या चोरी करणारे त्रिकूट गुन्हे शाखेने शनिवारी जेरबंद केले. प्रज्वल संतोष भुंबर (१९), निर्मलेश फुलेश भांबुरकर (२०) व मनिष बाळु मनोहरे (३०, तिघेही रा. वलगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यामधुन चार सोलर पॅनलच्या बॅटऱ्यासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या. त्यांच्या अटकेमुळे गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेला गुन्हा उघड झाला. आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या.

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, अंमलदार राजुआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतिष देशमुख, सूरज चव्हाण, निवृती काकड, अमोल बहाद्दरपुरे यांनी केली आहे.

Web Title: Three solar panel thieves arrested in amravati