लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौºयाच्या अनुषंगाने अमरावती विभागीय आयुक्तालयाकडून राजभवनाकडे तीन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यात मेळघाटसह अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी दौऱ्याचा प्रस्ताव आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदवीदान समारंभ आणि उन्नत भारत प्रकल्पांतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने २० डिसेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अमरावतीला येत आहेत. यामुळे मेळघाट किंवा झरीजामणी दौरा १९ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता प्रशासकीय सुत्रांकडून वर्तविली जात आहे. राजभवनाकडून राज्यपालांच्या मेळघाट दौऱ्याला संमती मिळते की झरीजामणीला, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. हा दौरा १९, २० डिसेंबर असा राहणार असल्याची शक्यता बळावली आहे.दरम्यान, या दौऱ्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासन कामाला लागले आहे. परतवाडा-धारणी मार्गावरील लवादा येथील देशपांडे यांच्या बांबू प्रकल्पाच्या अनुषंगाने राजभवनाकडून मेळघाट दौऱ्याला संमती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.राज्यपालांच्या संभाव्य मेळघाट दौऱ्यानिमित्त परतवाडा-चिखलदरा रस्त्यावरील मोथा गावालगतच्या जमिनीवर हेलिपॅड बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हेलिपॅडकरिता आवश्यक परिसर, जमीन साफ करण्यात आली असून, तेथे ले-आऊट देण्यात आले आहे. लाल झेंड्या लावून सीमांकन करण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करीत ही जागा निश्चित केली आहे. हेलिपॅडसाठी आवश्यक साहित्याकरिता आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाºयांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर त्यांचे ना-हरकत मिळताच हेलिपॅडच्या बांधकामास सुरुवात केली जाणार असल्याचे उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी स्पष्ट केले.हेलिपॅडची गरजचिखलदरा पर्यटनस्थळी हेलिपॅड आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी विमानतळाचा विषय पुढे रेटून धरला होता. काळाच्या ओघात तो मागे पडला. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोझरी पॉइंटवर डांबरीकरणासह कायमस्वरूपी हेलिपॅड बांधले गेले होते. यादरम्यान तेथे एमटीडीसीचे नवे संकुल साकारले गेले. यात ते उपयुक्त हेलिपॅड उद्ध्वस्त केले गेले. राज्यपालांच्या संभाव्य दौºयाच्या अनुषंगाने चिखलदºयाला सोयीचे असे मोथा येथे नव्याने हेलिपॅड बांधले जात आहे. हे हेलिपॅड कायमस्वरूपी असावे, पर्यटनाकरिता तो एक पॉइंट ठरावा, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यपालांच्या दौऱ्यासाठी राजभवनाकडे तीन प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौºयाच्या अनुषंगाने अमरावती विभागीय आयुक्तालयाकडून राजभवनाकडे तीन प्रस्ताव सादर करण्यात ...
राज्यपालांच्या दौऱ्यासाठी राजभवनाकडे तीन प्रस्ताव
ठळक मुद्देमोथा हेलिपॅडला हवी वरिष्ठांची ना-हरकत : यंत्रणा लागली कामाला