अमरावतीमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांची संख्या १०६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 21:10 IST2020-05-17T20:54:09+5:302020-05-17T21:10:47+5:30
कोरोनाचा विळखा अमरावती शहरात चांगलाच वाढत चालला आहे. बाधितांच्या संपर्कात आल्याने मसानगंज येथील ४४ व ३० वर्षीय पुरुषांसह हैदरपुºयातील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. सद्यस्थितीत संक्रमितांची संख्या १०६ वर पोहोचली आहे.

अमरावतीमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांची संख्या १०६
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा विळखा शहरात चांगलाच वाढत चालला आहे. बाधितांच्या संपर्कात आल्याने मसानगंज येथील ४४ व ३० वर्षीय पुरुषांसह हैदरपुºयातील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. सद्यस्थितीत संक्रमितांची संख्या १०६ वर पोहोचली आहे. यामध्ये १३ मृत, ६२ कोरोनामुक्त, तर ३१ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान बाधितांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून, या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आलेली आहे. शनिवारी बाधित आलेले गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या जमादाराच्या मुलाचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्याचा स्वॅब नागपूर येथे घेण्यात आला होता. या दोन व्यक्तींसह जुना कॉटन मार्केट परिसरात पॉझिटिव्ह आलेल्या एका राजकीय नेत्यावर देखील नागपूर येथे उपचार सुरू आहे.