अमरावती जिल्ह्यात चारचाकी झाडावर धडकून तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 22:34 IST2020-09-02T22:33:38+5:302020-09-02T22:34:04+5:30

भरधाव चारचाकी वाहन झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शहरातील धारणी मार्गावरील अंबिका लॉन्स जवळ २ सप्टेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला.

Three killed after four-wheeler hits tree in Amravati district | अमरावती जिल्ह्यात चारचाकी झाडावर धडकून तीन ठार

अमरावती जिल्ह्यात चारचाकी झाडावर धडकून तीन ठार


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरधाव चारचाकी वाहन झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शहरातील धारणी मार्गावरील अंबिका लॉन्स जवळ २ सप्टेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातीतील युवक बोरगाव मंजू येथील रहिवासी असल्याचे समजते. परतवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. एमएच ३० एटी १९२७ या चारचाकी वाहनाला हा अपघात झाला.

Web Title: Three killed after four-wheeler hits tree in Amravati district

टॅग्स :Accidentअपघात