‘त्या’ चार नराधमांच्या तीन रात्री आता हवालातीत !

By प्रदीप भाकरे | Updated: October 3, 2023 18:07 IST2023-10-03T18:03:36+5:302023-10-03T18:07:09+5:30

सामुहिक बलात्कार : ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Three accused who kidnapped a married woman and gang-raped her are in police custody | ‘त्या’ चार नराधमांच्या तीन रात्री आता हवालातीत !

‘त्या’ चार नराधमांच्या तीन रात्री आता हवालातीत !

अमरावती : अध्या रात्री एका विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अतिप्रसंग करणाऱ्या चौघांना आता पुढील तीन रात्री पोलीस हवालातीत काढाव्या लागणार आहेत. १ ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री २ ते २.३० च्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ती धक्कादायक घटना घडली होती. नराधामांच्या तावडतून सुटून तिने घर गाठत पतीजवळ आपबिती कथन केली होती. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१३ च्या सुमारास चार आरोपींविरूध्द खोलापुरी गेट पोलिसांनी अपहरण, बलात्कार, मारहाण व धमकीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास चौघांनाही अटक करण्यात खोलापुरी गेट पोलिसांना यश आले.

दरम्यान, मंगळवारी दुपारी अटक चारही आरोपींना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे चारही नराधमांना पुढील तीन रात्री हवालातीत पोलिसांचा पाहूणचार स्विकारावा लागेल. अमन ठाकूर (२१), अंकुश कोठार (२१), आकाश उगले (३२) व दिपक खेडवन (सर्व रा. अमरावती) अशी गुन्हा दाखल व अटक आरोपींची नावे आहेत. चारही आरोपी पिडित विवाहितेच्या परिचयातील आहेत. दरम्यान ओळखीतील विवाहितेचे अपहरण व सामुहिक अतिप्रसंगामागील कारण पोलीस कोठडीदरम्यान उघड होणार आहे.

अशी होती घटना

पीडित २७ वर्षीय विवाहित महिला रविवारी रात्री आपल्या कुटुंबासह घरी झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घराचे दार ठोठावले. आवाज ऐकून जागे झालेल्या महिलेने दार उघडल्यावर चारही आरोपी त्यांच्या घरात शिरले. त्यांनी महिलेसह त्यांच्या पतीला शिवीगाळ करीत मारहाण केली. पतीला तू घरीच बस, असे म्हणून आरोपींनी महिलेचे अपहरण केले. त्यानंतर महिलेला अमनच्या घरी नेत त्यांना शिवीगाळ करीत पुन्हा मारहाण केली. महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास आरोपींच्या तावडीतून सुटल्यावर महिलेने खोलापुरी गेट पोलिसांत तक्रार दाखल केली

Web Title: Three accused who kidnapped a married woman and gang-raped her are in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.