शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

हजारो मराठ्यांची मुंबईकडे कू च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:32 IST

सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी मुंबई येथे आझाद मैदानावर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआज विराट मोर्चा : महिला, युवती, युवकांची लक्षणीय गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी मुंबई येथे आझाद मैदानावर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून हजारो मराठ्यांनी मंगळवारी मुंबईकडे कूच केली. ‘मी मराठा, लाख मराठा’, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ - जय शिवराय, ‘रक्ता रक्तात भिनलयं काय, जय जिजाऊ- जय शिवराय’ या गगनभेदी नाºयांनी आसमंत दणाणून गेला होता.मुंबईत मराठा समाजाचा विशाल मोर्चा निघणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा मंगळवारी सकाळपासून सजग होती. मुंबईकडे जाणाºया मोर्चेकरांची वाहने, मराठा समाज बांधवांची संख्या, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने यावर गोपनीय विभाग लक्ष ठेवून होता. दुसरीकडे मोर्चेकरांसाठी ठिकठिकाणी पाणी, चहा, नास्ता वाटपाचा कार्यक्रमही राष्ट्रीय, राज्य महामार्गावर मोर्चा नियोजकांनी केले होते. बडनेरा रेल्वे स्थानकावरून हावडा-मुंबई गितांजली एक्सप्रेसने मराठा समाज बांधव मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाल्याची नोंद रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे.काही मराठा बांधवांनी सोमवारी खासगी वाहने, रेल्वे, ट्रॅव्हल्सने मुंबईकडे ेकूच केली. बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेसला जिल्ह्यातील मराठा मोर्चेकरांसाठी दोन विशेष कोच लावण्यात आलेत. ही सुविधा खा.आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने केल्याची माहिती नियोजकांनी दिली. धामणगावातून मराठा समाज मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याची नोंद झाली आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल, अमरावती-मुंबई एक्सप्रेस, नागपूर-दादर एक्सप्रेसनेही मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झालेत. मोर्चात युवक, युवती, महिलांची मोठी गर्दी असल्याचे पोलीस विभागाने शासनाला कळविले आहे.मोर्चेकरांसाठी चोख सुरक्षा व्यवस्थामुंबई येथे मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाºया मराठा समाज बांधवांच्या चोख सुरक्षा व्यवस्थेसाठी बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी तैणात होते. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी गोपनीय यंत्रणादेखील सज्ज करण्यात आली आहे.रेल्वेत दोन स्वतंत्र कोचजिल्हातील मराठा मोर्चेकरांसाठी हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेसमध्ये स्वंतत्र दोन कोच लावल्यामुळे मोर्चेकरांना दिलासा मिळाला. या कोचला अमरावती जिल्हा मराठा मोर्चा, असे बॅनर लावले होते. रेल्वे गाड्यांत स्वतंत्र कोचची व्यवस्था केल्यामुळे मुंबईकडे जाताना होणारी गैरसोय दूर झाली. मराठा बांधव रेल्वेंनीच मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.