‘त्या’ बोगस पीएच.डी. पदव्यांची तपासणी होणार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सचिवांचे पत्र

By गणेश वासनिक | Updated: February 24, 2025 20:28 IST2025-02-24T20:27:48+5:302025-02-24T20:28:08+5:30

Amravati News: राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातून (जेजेटीयू) पीएच.डी. मिळविणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे.

‘Those’ bogus Ph.D. degrees will be investigated, letter from the Secretary of the University Grants Commission | ‘त्या’ बोगस पीएच.डी. पदव्यांची तपासणी होणार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सचिवांचे पत्र

‘त्या’ बोगस पीएच.डी. पदव्यांची तपासणी होणार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सचिवांचे पत्र

- गणेश वासनिक 
अमरावती - राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातून (जेजेटीयू) पीएच.डी. मिळविणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी एका पत्राद्वारे देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना अशा बोगस पीएच.डी. तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बोगस पीएच.डी पदवीधारक किती महाशय आहेत, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

विद्यापीठांच्या प्रत्येक कृतीवर यूजीसीचे नियंत्रण असते. तथापि, राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाने बोगस पीएच.डी. पदवी दिल्याचे दिसून आले. त्यामुळे यूजीसीच्या स्थायी समितीने जेजेटीयूद्वारे सादर केलेली माहिती, डेटा विश्लेषण, तपासणी आणि मूल्यांकनानुसार पीएच.डी.च्या तरतुदीचे पालन झाले नाही, असा ठपका ठेवला आहे. पीएच.डी.च्या पुरस्कारासाठीचे नियम आणि शैक्षणिक मापदंडाला छेद दिला. तसेच यूजीसी पीएच.डी.च्या तरतुदींचे पालन करण्यात जेजेटीयू का अपयशी ठरले? हे स्पष्ट करण्याची संधी देण्यात आली होती. तथापि, जेजेटीयूने फारसा प्रतिसाद दिला नाही, असे यूजीसीने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे यूजीसीच्या स्थायी समितीने या बोगस पीएच.डी. प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत.

Web Title: ‘Those’ bogus Ph.D. degrees will be investigated, letter from the Secretary of the University Grants Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.