शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वरूड तालुक्यात २८ गावांत टंचाई, शहरांत सहा दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:17 AM

तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

ठळक मुद्देपळसोना गावात टँकरचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. पळसोना गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ३० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.यावर्षी पर्जन्यमान अल्प झाल्याने नदी-नाले, प्रकल्प कोरडेच राहिले. अवैध बोअरने अमर्याद उपसा केल्याने भूजल पातळी खालावली. त्याअनुषंगाने नुकताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुक्याचा दौरा करून जलसंधारण व पाणीटंचाईचा आढावा घेतला. करवार, सातनूर, बेनोडा, माणिकपूर व गव्हाणकुंडला भेट दिली. पळसोना येथे चार टँॅकर सुरू करण्याचे आदेश नवाल यांनी दिल्याचे नायब तहसीलदार सुदर्शन सहारे म्हणाले. विश्रामगृहावर महसूल, बांधकाम, कृषी, पं.स. अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागांप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पुरेशी साठवणक्षमता नसल्याने नागरिकांची परवड होत आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे. जमालपूर येथून २६ किमी हून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराला दरदिवशी ४० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणीटंचाईमुळे ते नियोजन कोलमडले आहे. शहरात दोन जलकुंभ असून त्यांची संचयक्षमता १३ लाख लिटरची आहे. त्यामुळे पळसोना गावाला टँकरने पुरवठा होत आहे.शहरातही हाहकारशहरात ९ हजार ५०० नळपुरवठाधारक आहेत. ९२ स्टँडपोस्ट आहेत. त्या स्टॅन्डपोस्टवर महिलांमध्ये होणारी शाब्दिक चकमक नित्याचीच झाली आहे. भूजलपातळी खालावल्याने शहरातील ९० टक्के विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना नळावरच अवलंबून राहावे लागते. जमालपूर पंपहाउसवरून होणारा पुरवठा लोणी, पिंपळखुटामार्गे येत असल्याने काही शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह लिकेज करून पाणी चोरल्याने शहराला होणºया पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली होती. त्याचा फटका दोन दिवसांवर येणारे नळ हे पाच ते सहाव्या दिवशी येऊ लागले. शहराबाहेरील वसाहतींमध्ये अद्यापही नळयोजना पोहोचली नसल्याने आणि या परिसरातील विहिरी आटल्याने तेथे नगरपरिषदेने तीन टँकर सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई