Theft at New Akola; 60 thousand lamps | नया अकोला येथे चोरी; ६० हजार लंपास

नया अकोला येथे चोरी; ६० हजार लंपास

अमरावती : वलगाव ठाणे हद्दीतील नया अकोला येथे अज्ञात आरोपीने चोरी करून आलमारीतील नगदी ६० हजार चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली.

फिर्यादी संतोष मधुकरराव गुळधे (६०, रा. नया अकोला) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

-----

‘..तर लग्नमंडपातून उचलून घेऊन जाईल’

अमरावती : ‘थांब मला बोलायचे आहे. मी तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. मी तुझ्याशी लग्न करतो. मला समजून घे, अन्यथा तुला लग्नमंडपातून उचलून घेऊन जाईल,’ अशी धमकी देऊन एका युवतीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना नांदगाव पेठ ठाणे हद्दीतील रहाटगाव येथे बुधवारी घडली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंदविला.

सौरभ सुनील वानखडे (२३, रा. सुरळी, ता. चांदूरबाजार) असे आरोपीचे नाव आहे. युवती शहरातील एका कॉलेजमध्ये गेली. तेथून ती रहाटगाव येथे मामाकडे घरी परत येत असताना आरोपीने दुचाकीवरून येऊन पाठलाग केला व विनयभंग केला. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४(ड), ५०६ अन्वय गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------------------------------------------------------------

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

अमरावती : युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भटवाडी शिवशक्तीनगर येथे बुधवारी घडली.

अंकुश श्यामराव कुलकर्णी (२०, रा. महावीरनगर) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी राजापेठ पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------------

विहिरीत उडी घेऊन अनोळखी इसमाची आत्महत्या

अमरावती : एका अनोळखी इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी खोलापुरीगेट ठाणे हद्दीतील गव्हाणे यांच्या शेतातील विहीर, गांधी आश्रमानजीक घडली. कुणीतरी विहिरीत उडी घेतल्याची माहिती येथील एका युवकाला मिळताच दोन युवकांनी विहिरीत उतरून दोराच्या साहाय्याने त्या इसमाला बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्या इसमाचा त्याचा मृत्यू झाला होता.

Web Title: Theft at New Akola; 60 thousand lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.