शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन शिक्षणाधिकारी गेले राजकीय आश्रयाला; शिक्षक भरतीत झाली कोट्यवधींची आर्थिक उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:50 IST

Amravati : जिल्हा परिषदेत 'बॅक डेट' शिक्षक भरती घोटाळा; आमदार, खासदारांची चुप्पी का?, संशयकल्लोळात पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन २०१२ पासून भरती बंद असताना 'बैंक डेट'मध्ये शिक्षक भरती राबवून कोट्यवधींचा व्यवहार करण्यात आला आहे. तसेच अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मान्यता यातही मोठा घोळ झाला आहे. यात तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मोठी माया जमविली असून, आता हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी त्या आमदार, खासदारांच्या घरी पायऱ्या झिजवत आहेत. तर दुसरीकडे शिक्षकी पेशाला लागलेल्या काळिमाची दखल न्यायपालिका सुमोटोच्या माध्यमातून अथवा स्वतः घेणार का? अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणारे तसेच टीईटीची व टेट पात्रता परीक्षा देऊन नियुक्तीची वाट पाहणारे लाखो विद्यार्थी करीत आहेत. 

शिक्षेसारख्या पवित्र मंदिराच्या ठिकाणी बोगस शिक्षकांच्या हाती आपल्या मुलाचे काय भवितव्य घडणार? यामुळे ग्रामीण पालक चिंतातुर आहेत. दुसरीकडे सरकारी नोकरी करत बहुतेकांनी आपल्या शिक्षण संस्था उघडल्या असून, आपल्या आप्त नातेवाइकांना मुख्याधापक बनवले आहे. २०१२ पासून शिक्षक भरती बंद होती. त्यादरम्यान जे लागले ते वेगळे, पण तीन वर्षापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती सुरू झाली. त्यानंतर ही भरती बंद झाली.

दरम्यान, याच काळात दलालांनी त्या आधीची नियुक्ती दाखवून मान्यतेचे बोगस प्रस्ताव दाखल करून घेण्यात आले. नियुक्ती जुनी असली तरी कोणाचा पगार या काळात सुरू झाला, त्यावरून हा घोटाळा सहज उघडकीस येऊ शकतो. याचा लेखाजोखा व अद्यावत सॉफ्टवेअर शिक्षण विभागाकडे आहे. त्याबरोबर अपर आयुक्त आदिवासी विभाग, नाशिक भरती जाहिरात २०१८ ही वादाच्या भोवऱ्यात घेण्यात आली होती. 

अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांची तक्रारराज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी हा घोटाळा उघड आणला. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यात शिक्षकांसोबत शिक्षणाधिकारी, उपसंचालक सुद्धा दोषी आहेत, असे खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांनी शिक्षक भरतीकरिता बोगस डिग्री, मृत्यू प्रमाणपत्र, जियंत असताना अनुकंपा घोटाळा झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कोलकाता न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राला लागूशिक्षक भरती घोटाळ्यात ममता बॅनर्जी सरकारला सरकारी शाळांमधील २५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या डेस्कने कायम ठेवला. शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया योग्य नव्हती, असे म्हणत न्यायालयाने कडक टिप्पणी केली होती. त्यामुळे हाच निर्णय महाराष्ट्रात लागू पडत असल्याने शिक्षक वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे.

"आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, यांनी मागून एन्ट्री करायची."- प्रियांका चोपडे, स्पर्धा परीक्षा अभ्यासक

"भरती प्रकिया बंद असताना भरती होते, हे जगातील आठवे आश्चर्य आहे."- रितेश कोकाटे, टीईटी पात्रताधारक

"गोल्डन गैंग बेरोजगारी दूर करते, हे माहीत नव्हते. आम्ही त्यांचीच सेवा केली असती."- नकुल क्षीरसागर, टीईटी पात्रताधारक

"अलादीन का चिराग जवळ असताना मी ठेकेदार बनून २० टक्के वाटत फिरत होतो. आता २० लाख रुपये कर्ज करून ठेकेदार बनण्यापेक्षा मास्तर झालो असतो."-अजय देशमुख

टॅग्स :Amravatiअमरावती