हिंसा प्रिय मानणारा समाज आपल्या अखेरच्या घटका मोजतोय- सरसंघचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 01:32 PM2022-04-29T13:32:14+5:302022-04-29T13:32:42+5:30

हिंसाचासामुळे कोणाचाही फायदा होत नसल्याचं मोहन भागवत यांचं वक्तव्य.

the society to which violence is dear is now counting its last days Non violent and peace loving people will stay RSS chief Mohan Bhagwat in Maharashtra Amravati | हिंसा प्रिय मानणारा समाज आपल्या अखेरच्या घटका मोजतोय- सरसंघचालक

हिंसा प्रिय मानणारा समाज आपल्या अखेरच्या घटका मोजतोय- सरसंघचालक

Next

“हिंसाचारामुळे कोणाचाही फायदा होत नाही. ज्या समाजाला हिंसाचार प्रिय होता तो आता अखेरच्या घटका मोजत आहे,” असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. अमरावतीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशात मध्यंतरी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे आणि मानवतेचं रक्षण केलं पाहिजे, असं म्हटलं. हिंसाचारानं कोणाचं भलं होत नाही. आपण कायम अहिंसक आणि शांतीप्रिय असलं पाहिजे. आपल्याला प्राधान्यानं हे काम करण्याची गरज असल्याचंही भागवत म्हणाले.

“सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता आणि ‘रकार’ म्हणजे सरकार सत्ता असेपर्यंत सरकार राज्य करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतात. मग ते सरकार कोणतेही असो. सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते आणि समाज ठरवेल तोपर्यंत सरकार राहू शकते,” असं भागवत म्हणाले. अमरावती शहरानजीकच्या भानखेडा मार्गालगत साकारण्यात आलेल्या संत कंवरधाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडीया यांच्या ऐतिहासिक गद्दीनशीनी समारोह ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते.


“आज सर्व काही झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे आता संपूर्ण समाजाने सुद्धा एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे. समाजाने वाईट विचार केला तर त्यातून गुंडगिरी निर्माण होऊ शकते, वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचे मन चांगले बनावे,” असंही ते म्हणाले. 

“मी तर सरकारमध्ये जात नाही, एकच गोष्ट सरकारने मला दिली, ती म्हणजे सुरक्षा. बस एवढेच माझ्याजवळ सरकारचे आहे, मी समाजाचा आहे, त्यामुळे मी सरकारमध्ये जात नाही, पण आपण सरकारमध्ये असलो तर चांगलं काम करू शकतो, मला इच्छा नसताना सुरक्षा मिळाली,” असं प्राजंळ मत भागवत यांनी मांडले.

Web Title: the society to which violence is dear is now counting its last days Non violent and peace loving people will stay RSS chief Mohan Bhagwat in Maharashtra Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app