लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र अडीच दशकांत थांबलेले नाही, तर यामध्ये वाढ होत आहे. सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनस्तरावरून घेतली जाते. त्यानुसार जिल्ह्यात ५५७७ तर सन २०२५ मध्ये २०१ शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत. यामध्ये मे महिन्यात सर्वात कमी ९ तर मेमध्ये सर्वाधिक २७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.
राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असली तरी शासन-प्रशासन शेतकरी आत्महत्या विषयात गंभीर नसल्याने शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. केवळ कर्जबाजारीपणामुळे नव्हे तर अन्य कारणांमुळेही शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहे. यापूर्वी महाडीबीटीमुळे गरजू शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाने राबविलेले प्रकल्प पांढरा हत्ती ठरले आहे. शेतकरी मिशनही विंवचनेतील शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलेला नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच असल्याचे वास्तव आहे.
केवळ सन २००१ पासून जिल्ह्यात ५,५७७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहे. यामध्ये शासन मदतीसाठी २९४४ प्रकरणे पात्र ठरली आहेत तर २५६८ प्रकरणे अपात्र आहेत. २९२९ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय ६५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.
विभागात ३६५ दिवसांत १०४० शेतकरी आत्महत्या
राज्यात वर्षभरात सर्वाधिक १०४० शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झालेल्या आहेत. दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहे. यामध्ये सर्वाधिक ३६४ शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या जिल्ह्यात झाल्या आहेत.
शेतकरी आत्महत्यांची कारणे
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, बँकांचे व खासगी सावकाराचे कर्ज, कर्जवसुलीस तगादा, मुलींचे लग्न, आजारपण आदी.
सन २०२० पासून आत्महत्या
- सन २०२० - २९५
- सन २०२१ - ३७०
- सन २०२२ - ३४९
- सन २०२३ - ३२६
- सन २०२४ - २००
- सन २०२५ - २०१
वर्षभरात फक्त ६० प्रकरणात शासन मदत
सन २०२५ मध्ये जिल्ह्यात २०१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये ७५ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली तर ६१ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. याशिवाय फक्त ६० प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. तर नऊ महिन्यांपासून ६५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे आता या प्रलंबीत प्रकरणाचा निपटारा केव्हा होणार हा खरा प्रश्न
Web Summary : Farmer suicides persist in Amravati, with 201 deaths recorded this year. Debt, crop failure, and lack of effective government aid contribute to the crisis. Amravati division saw 1040 suicides in a year, highlighting the severity.
Web Summary : अमरावती में किसान आत्महत्याएँ जारी हैं, इस साल 201 मौतें दर्ज की गईं। ऋण, फसल विफलता और प्रभावी सरकारी सहायता की कमी संकट में योगदान करते हैं। अमरावती संभाग में एक साल में 1040 आत्महत्याएँ हुईं, जो गंभीरता को उजागर करती हैं।