पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव, अध्या रात्री चोरांचे त्रिकूट जेरबंद

By प्रदीप भाकरे | Published: October 18, 2023 02:08 PM2023-10-18T14:08:29+5:302023-10-18T14:09:11+5:30

मिरचीपूड, चाकू व अन्य साहित्य घेऊन दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या तिघांना शहर पोलिसांनी त्वरेने अटक केली.

The police foiled the robbery plan, the trio of thieves were jailed last night | पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव, अध्या रात्री चोरांचे त्रिकूट जेरबंद

पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव, अध्या रात्री चोरांचे त्रिकूट जेरबंद

अमरावती: मिरचीपूड, चाकू व अन्य साहित्य घेऊन दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या तिघांना शहर पोलिसांनी त्वरेने अटक केली. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हददीतील अशोक विहार परिसरात १८ ऑक्टोबर रोजी पहाटे २.१० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून एक चायना चाकू, पेचकस 3) सुती दोरी, मिरची पूड, विना क्रमांकाची दुचाकी व दोन मोबाईल असा ८७ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

सैयद तोसिफ सैयद आसिफ (२१), अहेमद बेग वल्द रशीद बेग (२३) व शेख जमील वल्द शेख मुस्ताक (२२, तिघेही रा. लालखडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांत पहाटे तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख लॉन तसेच शिवनेरी नगर भागात चो-या व घरफोडी होत असल्याने पोलीस आयुक्तांनी त्या भागात रात्रीची गस्त अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व त्यांचे पथक मंगळवारी रात्री त्या भागात गस्त घालत होते.

दरम्यान, पथकाला पहाटे दोनच्या सुमारास पाच इसम घोळक्याने बसलेले दिसले. तसेच त्यांच्या बाजूला दोन गाडया दिसल्या. टिम चोरमले यांनी घेराव घालून त्या इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला असता तनी आरोपींना पकडण्यात आले. तर, अन्य दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. ते दरोडा टाकण्याच्या उददेशाने शस्त्र बाळगून एकत्र मिळून आल्याने त्याचे विरुदध भादंविचे कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी रेकार्डवरील गुन्हेगार

तीनही आरोपी हे रेकॉर्डवरील असून, त्यांच्याविरुदध चोरीचे व इतर गुन्हे नोंद आहे. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्र. एकचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले, सहायक पोलीस निरिक्षक मनीष वाकोडे, उपनिरिक्षक प्रकाश झोपाटे, हवालदार राजूआपा, फिरोज खान, सतीष देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, चालक अमोल बाहदरपूरे, आकाश कांबळे, किशोर खेंगरे यांनी ही कारवाई केली.

Web Title: The police foiled the robbery plan, the trio of thieves were jailed last night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.