निर्लज्जपणाही लाजेल! वासनांध मुलाने जन्मदात्रीकडेच केली शरीरसंबंधांची मागणी; धामणगावची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 13:18 IST2023-06-04T13:17:38+5:302023-06-04T13:18:49+5:30
३ जून रोजी रात्री आठच्या सुमारास तो धक्कादायक प्रकार उघड झाला. महिला घरात काम करत होती...तिचा मुलगा आला...

निर्लज्जपणाही लाजेल! वासनांध मुलाने जन्मदात्रीकडेच केली शरीरसंबंधांची मागणी; धामणगावची घटना
अमरावती : नात्यातील नैतिकता लोप पावत चालली की काय, असा विचार करण्यास भाग पाडणारी एक अश्लाघ्य घटना धामणगाव रेल्वे तालुक्यात उघड झाली. तेथे चक्क जन्मदात्रीलाच शरीरसंबंधांची मागणी करण्यात आली.
३ जून रोजी रात्री आठच्या सुमारास तो धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणी ५० वर्षीय पिडित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या ३० वर्षीय विकृत तरूण मुलाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ३ जून रोजी रात्री ११.५० सुमारास दत्तापूर पोलिसांनी त्याबाबत एफआयआर नोंदविला. संबंधित महिला रात्रीच्या वेळी घरात काम करीत असताना आरोपी तिच्याजवळ गेला. अतिशय चुकीच्या पध्दतीने बोलून आरोपीने त्या महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तिचा विनयभंग देखील केला. पोटच्या मुलाने केलेला तो विकृतपणा ती सहन करू शकली नाही. तिने तितक्याच रात्री दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तरूण मुलाविरूध्द तक्रार नोंदविली.