शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नाही; औषधी देणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 1:00 PM

Amravati : २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पदे रिक्त; पदभरती रखडली

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिका ही महत्त्वाची आहे; परंतु जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधपुरवठा व वितरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फार्मासिस्टची २८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधी मिळण्यासाठी अडचणी येत असल्याचे दिसून आले. काही आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांचीही पदे रिक्त असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रे ही महत्त्वाची आहेत. त्यामुळे किरकोळ आजारावर रुग्णांना तातडीने गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात ही आरोग्य केंद्रे महत्त्वाची ठरत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत; परंतु यातील २८ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना औषध देणाऱ्या फार्मासिस्टचे पद रिक्तच आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी उपलब्ध होत नसून, त्यांना इतर शासकीय रुग्णालयात औषधीसाठी यावे लागत आहे.

संबंधित आरोग्य केंद्रात कोणकोणती औषधी उपलब्ध आहेत, कोणत्या औषधी कमी आहेत, याची मागणीदेखील जिल्हा परिषदेच्या औषधी भांडार विभागाकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी तसेच प्रत्येक रुग्णास आवश्यक औषधी उपलब्ध करण्यासाठी रिक्त फार्मासिस्टची पदे भरण्याची मागणी होत आहे.

उपचार होतात; मात्र औषधी नाहीप्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक उपचार सुविधा मिळते; परंतु आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नसल्याने डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी मिळत नाही. काही ठिकाणी औषधी उपलब्ध नसल्याचे उत्तर रुग्णांना दिले जाते, तर जेथे फार्मासिस्टचे पद रिक्त आहे, त्याठिकाणी इतर आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्टवर अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. परंतु, एकाच वेळी दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवा कशी देणार, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. 

पदभरती अडकलीराज्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्टच्या रिक्त पदांसाठी पदभरती राबविण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परीक्षादेखील घेण्यात आली; परंतु आचारसंहितेमुळे पुढील निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने पदभरतीमधील निवड प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

टॅग्स :medicinesऔषधंHealth Tipsहेल्थ टिप्सMedicalवैद्यकीयHealthआरोग्यmedicineऔषधंdoctorडॉक्टर