शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

मेळघाटातील ब्रिटिशकालीन ११८ पुलांचे अस्तित्व धोक्यात ; शंभरीपार पुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:37 IST

Amravati : सुरक्षा फलक लावल्याने थांबतील का अपघात?, दोन्ही तालुक्यातील दुर्गम भागातही आहेत ते पूल

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा :मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात ब्रिटिशकालीन ११८ पुलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. १०० वर्षापेक्षा अधिकचा काळ या पुलांच्या निर्मितीला झालेला आहे. त्यामुळे पुनर्बाधणी नूतनीकरण करणे गरजेचे आहे. त्यातील ३२ पुलांचे पुनर्बाधणीसह दुरुस्तीला ७० कोटी रुपये आवश्यक आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.

या जीवघेण्या पुलांच्या सुरक्षा कठडवावर दिशानिर्देश देणारे फलक लावून वाहतूक सुरू आहे. व्याघ्र प्रकल्पाचे जाचक नियम, या टेबलापासून तर त्या टेबलावर अटकणाऱ्या फाइल. यातच पुलांचे अस्तित्व संपले असून, नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.  

जिल्ह्यातील बामणी, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, बडनेरा, अचलपूर, धारणी, बुन्हानपूर आंतरराज्य महामार्ग-१४ आहे. रस्त्यावरील ब्रिटिशकालीन अरुंद असलेल्या पुलाच्या ठिकाणी स्थापत्य उपाययोजना आणि पुनर्बाधणी करण्यासाठी ३२ पुलांच्या कामासाठी जवळपास ७० कोटींचा प्रस्ताव २०२७च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी शासनाला पाठविण्यात आलेला आहे. मेळघाटातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी जवळपास सर्वच रस्ते आणि पूल तयार करण्याची गरज आहे. दळणवळणासाठी आदिवासींचा आरोग्याचा प्रश्न घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी पाठविला जात असला तरी रस्ते विकासासाठी मात्र शासनाच्या तिजोरीत दुष्काळ असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. 

प्रवासी बस, पर्यटकांची वाहने दरीतमेळघाटात रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडेसुद्धा आवश्यक आहे. एसटी बस, मध्य प्रदेशातून येणारे मालवाहू ट्रक आणि एक खासगी बस पुलाखाली कोसळल्याने कित्येक अपघात होऊन जीवितहानी झालेली आहे.

सुरक्षा फलकावर जीवघेणा प्रवासया पुलांवरून प्रवास करणे जीवावर बेतणारे ठरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठिकठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले असले तरी. व्याघ्र प्रकल्पाची जाचक नियम पाहता मेळघाटातील रस्ते विकासाकरिता परवानगीची गरज आहे.

"मेळघाटातील पूल जुने झाल्याने निर्मिती व दुरुस्तीची गरज आहे. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पाला पत्र दिले आहे."- नीलेश चौधरी, उपविभागीय अभियंता

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावती