कर्मचारीच निघाला 'घर का भेदी' ! पेट्रोलपंप चालकाला मारहाण करून लुुटणारे दोन भामटे पकडले
By प्रदीप भाकरे | Updated: September 10, 2025 13:42 IST2025-09-10T13:38:42+5:302025-09-10T13:42:09+5:30
अवघ्या १२ तासात उलगडा : एलीबी व चांदुर रेल्वे पोलिसांची कारवाई,कर्मचाऱ्यानेच दिली टिप

The employee helped the criminals ! Two thugs who beat up the petrol pump driver and robbed him were caught
अमरावती : चांदुर रेल्वे येथील एका पेट्रोलपंप चालकाला मारहाण करून त्यांच्याकडील २ लाख ८१ हजार २९८ रुपये जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या तिघां पैकी दोघांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल होण्याच्या १२ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा व चांदुर रेल्वे पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री ११च्या सुमारास ही कारवाई केली. शुभम गोपाल पवार (वय २२ वर्ष, रा काकडधरा, तळेगाव शामजी पंत) व रोशन उर्फ राम रविंद्र चव्हाण (वय १८ वर्ष, रा. राजीव गांधी नगर, चांदुर रेल्वे) असे अटक आरोपींची नावे आहेत. ८ सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ ते ११.३० च्या सुमारास चांदुर रेल्वे येथील जिजामाता कॉलनी येथे ती जबरी चोरीची घटना घडली होती.
चांदुर रेल्वेस्थित जिजामाता कॉलनी येथील रहिवासी असलेले चंपालाल अग्रवाल (७५) यांचे दोन पेट्रोलपंप आहेत. ८ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या पेट्रोलपंपावरील कॅशियरने एकुण २,८,२९८ रुपये एका पिशवीत टाकून ती अग्रवाल यांच्या कारमध्ये ठेवली. ते कारने जिजामाता कॉलनी येथे घराजवळ गेले. तथा कार थांबवुन कारचे गेट उघडून त्यांनी पैशाची पिशवी हाती घेतली. त्याचवेळी एका दुचाकीहून तीन अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी अग्रवाल यांना लोटलाट करुन पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावून धामणगाव रेल्वेच्या दिशेने पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल केला.
कर्मचारी निघाला ‘घर का भेदी’
तपासादरम्यान पोलिसांनी अग्रवाल पेट्रोल पंपावरील कर्मचारी रोशन उर्फ राम यास ताब्यात घेतले. पेट्रोलपंप मालक रात्रीचे वेळी पैसे कधी आणि कशाने घेऊन जातात, अशी माहिती आपणच शुभम पवारला दिली होती, अशी कबुली त्याने दिली. शुभम हा त्याच्या दोन साथीदारास चांदुर रेल्वेला आला. त्याचवेळी आरोपी रोशन याने मालक पैसे घेऊन निघाल्याची टिप दिली. त्यावर आरोपींनी अग्रवाल यांचा पाठलाग केला. तथा त्यांना धक्का देऊन त्यांच्याकडील रोकड पळविली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, एलसीबीप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात चांदुर रेल्वेचे ठाणेदार अजय आकरे, सहायक पोलिस निरीक्षक शरद आहेर, उपनिरीक्षकत्रयी रोहित कुदळे, नितेश आझडे व नंदलाल लिंगोट यांच्या पथकाने ही कारवाई केली.