दुहेरी हत्याकांडाने तिवसा हादरले ! शेजाऱ्यानेच धारदार शस्त्राने केला सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:40 IST2025-09-03T16:26:10+5:302025-09-03T16:40:15+5:30
Amravati : घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत एसडीपीओ अनिल पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल

The double murder shocked everyone! The neighbor stabbed him repeatedly with a sharp weapon
तिवसा (अमरावती) : शहरातील अशोक नगरमध्ये बुधवारी सकाळी माय लेकाच्या दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली. सुशिला वसंतराव डाखोरे वय ५८, व अमोल वसंतराव डाखोरे वय ३७ रा.अशोकनगर, तिवसा अशी मृतकांची नावे आहेत.
डाखोरे कटुंबाच्या शेजारीच राहणा-या आरोपींनी घरात घुसुन अमोल डाखोरे व त्याची आई सुशीला डाखोरे यांचेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.यामधे त्याचा जागीच मृत्यु झाला.तर आजीला वाचवायला गेलेल्या हिमांशु अमोल डाखोरे वय ८ वर्ष या मुलाच्या डाव्या हाताची दोन बोटं कापल्या गेली.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत एसडीपीओ अनिल पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असुन पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे. शेजारीच राहणा- या तीन मायलेकांना या प्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतले.